पाच मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली 1 ठार 7 जणांची सुखरुप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 06:35 PM2018-07-22T18:35:05+5:302018-07-22T18:42:20+5:30
येथील मसूरीच्या मिसलगढी परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 11 जण अडकले होते.
गाझियाबाद - येथील मसूरीच्या मिसलगढी परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 11 जण अडकले होते. त्यापैकी 7 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, एक जणाचा मृत्यू झाला. एनडीआरएफ जवानांच्या दोन पथकांसह स्थानिक नागरिकांकडून मदतीचे काम जोरात सुरु आहे.
मिसलगढी परिसरात बांधकाम करण्यात आलेली ही इमारत पूर्णपणे अवैधपणे बांधण्यात आली होती. त्यामुळे या दुर्घटनेतील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करत मदतीचे आणि बचाव कार्य वेगात करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. अद्यापही या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण अडकल्याची भीती व्यक्त होत असून त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, ग्रेटर नोएडा येथील सेक्टर 63 मध्ये शनिवारी सकाळी एक इमारत कोसळली होती. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. तर अजून एक इमारत एका बाजूला झुकल्याने 16 कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात आले होते.
UP CM Yogi Adityanath CM directs DM & SSP Ghaziabad to visit the site of building collapse in Ghaziabad, to take immediate action for rescue operations along with NDRF and lodge an FIR and take action against those guilty. (File pic) pic.twitter.com/pm4eBmC6IZ
— ANI UP (@ANINewsUP) July 22, 2018