दहावीच्या निकालानंतर २४ तासात पाच आत्महत्या
By admin | Published: May 18, 2016 12:36 PM2016-05-18T12:36:25+5:302016-05-18T12:36:25+5:30
मध्यप्रदेशात दहावीचा निकाल जाहीर होताच मागच्या २४ तासात पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एक मुलगा घरातून बेपत्ता झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. १८ - मध्यप्रदेशात दहावीचा निकाल जाहीर होताच मागच्या २४ तासात पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एक मुलगा घरातून बेपत्ता झाला आहे. हा मुलगा दहावीच्या परिक्षेत नापास झाला आहे. भोपाळमध्ये दोन मुलांनी आत्महत्या केल्या. सागर, सतना आणि रेवा येथील प्रत्येकी एका मुलाने आत्महत्या केली.
भोपाळच्या शहाजहानबादमध्ये रहाणा-या पूजा सांधे या १६ वर्षीय मुलीने घरात गळफास घेऊन जीवन संपवले. निकाल जाहीर झाल्यानंतर ही मुलगी कोणाशीही बोलत नव्हती. मंगळवारी घरात पालक नसताना तिने पंख्याला लटकून आत्महत्या केली अशी माहिती शहाजहानबाद पोलिसांनी दिली. ही मुलगी सुद्धा दहावीच्या परीक्षेत नापास झाली होती.
बैरासिया भागात रहाणा-या राजेश पटेल या मुलाला त्याचा दहावीचा निकाल समजताच तो घराबाहेर निघून गेला. तो घरी परतल्यानंतर त्याला उलटया सुरु झाल्या. पालकांनी त्याला रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याने विषप्राशन करुन आत्महत्या केली. अन्य तीन मुलांनीही निकालाने निराश होऊन आत्महत्येचा मार्ग निवडला.