एटीएमने दिले पाचपट पैसे
By admin | Published: December 17, 2015 01:10 AM2015-12-17T01:10:45+5:302015-12-17T01:10:45+5:30
राजस्थानातील सीकर या शहरात एका एटीएमसमोर नागरिकांची गर्दी वाढतच होती. अगदी लोक हमरीतुमरीवर आले होते. त्याला कारणही तसेच होते. हे एटीएम चक्क पाच पट पैसे देत होते.
सीकर : राजस्थानातील सीकर या शहरात एका एटीएमसमोर नागरिकांची गर्दी वाढतच होती. अगदी लोक हमरीतुमरीवर आले होते. त्याला कारणही तसेच होते. हे एटीएम चक्क पाच पट पैसे देत होते. अखेर येथे पोलीस दाखल झाल्यानंतर गर्दी हटविण्यात आली.
झाले असे की, सीकर जिल्ह्यातील एका एटीएमवर शंभर रुपयांची मागणी केल्यानंतर ५०० रुपये मिळत होते, तर ५०० रुपयांच्या ऐवजी २५०० रुपये आणि १००० रुपयांऐवजी ५००० रुपये या एटीएममधून मिळत होते. विशेष म्हणजे ग्राहकाने १०० रुपये मागितल्यावर ५०० रुपये तर मिळत होते; पण खात्यातून १०० रुपयेच वजा होत होते. अर्थात बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघताबघता या एटीएमभोवती एकच गर्दी झाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले आणि या गर्दीला हटविले.
- बँक अधिकाऱ्यांची एक टीम सकाळी या ठिकाणी पोहोचली. या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या व्यक्तींनी या एटीएममधून पैसे काढले आहेत त्यांची यादी तयार करण्यात येणार असून त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे वसूल करण्यात येतील.