सीबीआयमध्ये पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 05:50 PM2019-01-10T17:50:49+5:302019-01-10T17:51:51+5:30
सीबीआयच्या संचालकपदी आलोक वर्मा यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर मोठी घडामोड मानली जात आहे.
नवी दिल्ली : सीबीआयच्या संचालकपदी आलोक वर्मा यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर आज पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
सह संचालक अजय भटनागर, डीआयजी एम के सिन्हा, तरुण गौबा, मुरमगेसन आणि अतिरिक्त संचालक ए. के. शर्मा यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
CBI Sources: Anish Prasad continues Deputy Director, Administration, CBI Headquarters. KR Chaurasia will head Special Unit-I (the unit which carries surveillance) https://t.co/vsxiD9KNUz
— ANI (@ANI) January 10, 2019
तसेच अनिश प्रसाद हे सीबीआय मुख्यालयाच्या प्रशासन विभागाचे उप संचालक पदीच कायम राहणार आहे. तर के आर चौरासिया हे विशेष युनिट क्र.1 च्या प्रमुखपदी राहणार आहेत.