तडवीने चोरल्या सरकारी कार्यालयातीलच दुचाकी पाच दिवस कोठडी : यावल व रावेर तालुक्यातून पंधरा दुचाकी हस्तगत
By admin | Published: June 30, 2016 10:28 PM2016-06-30T22:28:36+5:302016-06-30T22:28:36+5:30
जळगाव: पुणे पोलीस आयुक्तालयात लिपिक असलेल्या सरफराज कलिंदर तडवी (वय ३५ रा.दौंड, पुणे ह.मु. कुसुंबा ता.रावेर) याने सरकारी कार्यालयातूनच दुचाकीची चोरी केली आहे. त्याने आतापर्यंत २६ दुचाकी चोरल्याची कबुली दिली असली तरी हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, बुधवार व गुरुवार या दोन दिवसात त्याने पोलिसांना यावल व रावेर तालुक्यातून १५ दुचाकी काढून दिल्या आहेत.
Next
ज गाव: पुणे पोलीस आयुक्तालयात लिपिक असलेल्या सरफराज कलिंदर तडवी (वय ३५ रा.दौंड, पुणे ह.मु. कुसुंबा ता.रावेर) याने सरकारी कार्यालयातूनच दुचाकीची चोरी केली आहे. त्याने आतापर्यंत २६ दुचाकी चोरल्याची कबुली दिली असली तरी हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, बुधवार व गुरुवार या दोन दिवसात त्याने पोलिसांना यावल व रावेर तालुक्यातून १५ दुचाकी काढून दिल्या आहेत.बुधवारी सकाळी अकरा वाजता जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दुचाकी चोरताना तडवीला रंगेहाथ पकडण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, उपनिबंधक कार्यालयात, जिल्हा रुग्णालय व न्यायालय आवारातून या दुचाकी चोरल्या आहेत. जळगाव, धुळे व मध्यप्रदेशातील काही जिल्ात निम्मे किमतीत त्याने या दुचाकी विक्री केल्या आहेत.एकाच कंपनीच्या चोरल्या दुचाकीदुचाकी चोरीत तडवीचा हातखंडा होता. सरकारी कार्यालयात गेल्यानंतर तेथे येणार्या दुचाकीस्वारांवर नजर ठेवून असायचा. ती व्यक्ती कार्यालयात गेली की, त्या दुचाकीजवळ जाऊन जणू ती दुचाकी आपलीच आहे या आवेशात काही वेळ उभे रहायचे. नंतर दुचाकील हॅँडल लॉक आहे का ते तपासायचे. ज्या दुचाकीला लॉक आहे, तिचा विचार सोडून दुसरी दुचाकी शोधायची. विना लॉक दुचाकीला चाबी लावून थेट त्या कार्यालयातून बाहेर पडायचे, ही त्याची चोरीची पध्दत होती.मारुळला आढळल्या सात दुचाकीयावल तालुक्यातील मारुळ येथे तब्बल सात दुचाकी त्याने विक्री केल्या होत्या. दहा ते पंधरा हजारात या दुचाकी चोरल्या होत्या. विशेष म्हणजे त्याने चोरलेल्या सर्व दुचाकी या हिरोहोंडा कंपनीच्या फॅशन आहेत. रावेर, फैजपूर व सावदा या भागातून अन्य दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या भागात आणखी दुचाकी असण्याची शक्यता आहे.दुचाकी घेणार्यांना नाही केले आरोपीचोरी करणे व चोरीची वस्तू घेणार्यांना आतापर्यंतच्या घटनांमध्ये दोघांना आरोपी करण्यात आले आहे. या गुन्ात मात्र दुचाकी विकत घेणार्या एकाही जणाला आतापर्यंत आरोपी करण्यात आलेले नाही. तडवीसोबत आणखी कोणी आहे का? याची माहिती काढली जात आहे. दरम्यान, सहायक निरीक्षक जयपाल हिरे यांनी तडवी याला न्यायालयात हजर केले असता ४ जुलै पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.