पाच वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गखोलीत बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:32 AM2017-09-11T01:32:46+5:302017-09-11T01:33:21+5:30

नवी दिल्ली येथील टागोर पब्लिक स्कूलच्या शिपायाने एका ५ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गखोलीतच बलात्कार केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

 Five-year-old girl student raped by classmates | पाच वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गखोलीत बलात्कार

पाच वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गखोलीत बलात्कार

googlenewsNext

नवी दिल्ली : येथील टागोर पब्लिक स्कूलच्या शिपायाने एका ५ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गखोलीतच बलात्कार केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत, तर शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाई करून, निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित मुलीच्या काकाने केली आहे.
पोलीस उपायुक्त नुपूर प्रसाद यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी विकास (४०) याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे. आरोपी विकास हा मूळचा झारखंडचा आहे. त्याला दोन किशोरवयीन मुले आहेत. तीन वर्षांपासून तो या शाळेत काम करीत आहे. तो या शाळेत पूर्वी सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. या शाळेत काम करण्यापूर्वी विकासने अन्य दोन शाळांमध्ये काम केलेले आहे.
शनिवारी दुपारी विकास या मुलीला रिकाम्या वर्गखोलीत घेऊन गेला आणि बलात्कार केला. जर कोणाला याबाबत सांगितले, तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकी त्याने या मुलीला दिली. त्यानंतर, या मुलीने रक्तस्त्राव व वेदना होत असल्याचे आईला सांगितले. कुटुंबीय या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तिथे तपासणीनंतर मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची बाब समोर आली. पीडित मुलीला समुपदेशनासाठी पाठविण्यात आले आहे.
या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देतानाच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नियम तयार करण्यात येतील. दिल्लीच्या महिला आयोगाने शाळेला नोटीस जारी केली असून, विकासच्या नियुक्तीचे तपशील मागविले आहेत. ही शाळाच बंद करण्याची मागणी मुलीच्या आईने केली आहे, तर शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी मुलीच्या काकांनी केली आहे.

Web Title:  Five-year-old girl student raped by classmates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.