बापरे! आधी दृष्टी गेली, असह्य वेदना झाल्या अन् श्वास थांबला; रहस्यमयी आजाराने 48 तासांत 5 बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 01:00 PM2022-10-28T13:00:40+5:302022-10-28T13:08:26+5:30
दिवाळीपर्यंत सर्वजण पूर्णपणे निरोगी असल्याचे मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले. दिवाळी आनंदात साजरी होत होती. रात्रीपासून सर्वांची प्रकृती अचानक ढासळू लागली.
बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. करगहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडकी खडारी गावात गेल्या 48 तासांत रहस्यमयी आजाराने चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन भावंडांचाही समावेश आहे. तसेच गावातही एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीय या मृत्यूला गूढ आजार म्हणत आहेत. सर्वप्रथम या लोकांना डोळ्यांनी कमी दिसू लागले आणि नंतर काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला. विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याची चर्चा काही ग्रामस्थ करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खडारी गावातील रहिवासी अर्जुन पासवान यांची दोन मुले 28 वर्षीय बुधू पासवान आणि 24 वर्षीय चंदन पासवान यांची प्रकृती अचानक बिघडली. मंगळवारी रात्री बुद्धूचा मृत्यू झाला तर बुधवारी सकाळी चंदनचा मृत्यू झाला. त्याच गावातील राज किशोर सिंह यांचा मुलगा धनंजय सिंह याचाही बुधवारी सकाळी मृत्यू झाला तर सुदर्शन यादव यांचा 32 वर्षीय मुलगा संजय यादव याचा मृत्यू झाला. त्याचवेळी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहारी गावातील जगदीश सिंग यांचा मुलगा मनीष सिंग याचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. आणखी एका तरुणावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिवाळीच्या रात्रीपासून प्रकृती खालावली
दिवाळीपर्यंत सर्वजण पूर्णपणे निरोगी असल्याचे मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले. दिवाळी आनंदात साजरी होत होती. दिवाळीच्या रात्रीपासून सर्वांची प्रकृती अचानक ढासळू लागली. तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, तेथे दोनच दिवसांत पाचही जणांचा मृत्यू झाला. सर्वांचा रक्तदाब अचानक कमी झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. कंबरेखाली असह्य वेदना होत होत्या. काही वेळाने दृष्टी गेली. यानंतर सर्वांचाही मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
गावकऱ्यांना बनावट दारूमुळे मृत्यूची होती भीती
खराडी गावातील काही ग्रामस्थांनी विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. मात्र मृत्यूचं कारण रहस्यमयी आजार असल्याचं नातेवाईक सांगत आहेत. संजय यादव यांचे वडील सुदर्शन यादव सांगतात की, माझा मुलगा कधीही नशा करत नव्हता. त्यामुळे दारूमुळे मृत्यू होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत. नरोत्तम चंद्र यांनी सांगितले की, सर्व तरुणांचा मृत्यू रहस्यमयी आजाराने झाला आहे. त्यापैकी बहुतेकांनी कोणत्याही प्रकारची नशा केलेली नाही, त्यामुळे विषारी दारूबद्दल बोलणे चुकीचे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"