Gujarat Assembly Election 2022: गेल्या पाच वर्षांत गृहमंत्र्यांच्या मालमत्तेत 721 टक्क्यांनी वाढ; निवडणूक लढवणार्‍या 125 आमदारांपैकी 5 झाले अधिक श्रीमंत, ADR चा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 05:42 PM2022-11-30T17:42:46+5:302022-11-30T17:45:17+5:30

Gujarat Assembly Election 2022: या निवडणुकीत सर्व पक्षांनी रिंगणात उतरवलेल्या 125 आमदारांपैकी मालमत्ता वाढीच्या बाबतीत अव्वल पाच आमदार भाजपचे  (BJP) असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Five yrs, assets up 721%: Gujarat Home Minister Harsh Sanghavi's financial value balloons, ADR data | Gujarat Assembly Election 2022: गेल्या पाच वर्षांत गृहमंत्र्यांच्या मालमत्तेत 721 टक्क्यांनी वाढ; निवडणूक लढवणार्‍या 125 आमदारांपैकी 5 झाले अधिक श्रीमंत, ADR चा रिपोर्ट

Gujarat Assembly Election 2022: गेल्या पाच वर्षांत गृहमंत्र्यांच्या मालमत्तेत 721 टक्क्यांनी वाढ; निवडणूक लढवणार्‍या 125 आमदारांपैकी 5 झाले अधिक श्रीमंत, ADR चा रिपोर्ट

Next

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) मंगळवारी गुजरात निवडणुकीशी (Gujarat Election) संबंधित काही आकडेवारी सादर केली आहे. या आकडेवारीनुसार, गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सांघवी  (Harsh Sanghavi) यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत 721 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या निवडणुकीत सर्व पक्षांनी रिंगणात उतरवलेल्या 125 आमदारांपैकी मालमत्ता वाढीच्या बाबतीत अव्वल पाच आमदार भाजपचे  (BJP) असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष सांघवी आणि त्यांच्या पत्नीची मालमत्ता 2017 मध्ये 2.12 कोटी रुपये होती. ती आता 2022 मध्ये 17.42 कोटी रुपये झाली आहे, असे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) रिपोर्टद्वारे समोर आले आहे. तसेच, हिरे व्यापारी हर्ष सांघवी पुन्हा एकदा सूरतच्या माजुराच्या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. रिपोर्टनुसार, सांघवीच्या तुलनेत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची संपत्ती 2017 मध्ये 5.19 कोटी रुपयांवरून 2022 मध्ये 58 टक्क्यांनी वाढून 8.22 कोटी रुपये झाली आहे.

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या आकडेवारीनुसार, सर्व पक्षांनी रिंगणात उतरवलेल्या 125 आमदारांपैकी मालमत्ता वाढीच्या बाबतीत अव्वल पाच आमदार भाजपचे आहेत. सांघवी यांच्याशिवाय भाजपच्या अन्य चार आमदारांच्या संपत्तीत पाच वर्षांतील सर्वाधिक वाढ झाली आहे. या आमदारांमध्ये खेडा जिल्ह्यातील मेहमदाबाद मतदारसंघाचे उमेदवार ग्रामविकास मंत्री अर्जुनसिंह चौहान यांच्या कौटुंबिक संपत्तीत 573 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  दुसरीकडे, दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा येथील शैलेश भाभोर (संपत्तीमध्ये 481 टक्के वाढ), उंबरगाव येथील रमणलाल पाटकर (संपत्तीमध्ये 335 टक्के वाढ), बडोदा शहरातील मनीषा वकील (संपत्तीमध्ये 308 टक्के वाढ)  समोर आले आहेत. 

दरम्यान, गुजरात विधानसभेसाठी यंदा पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या 125 आमदारांपैकी 71 भाजपचे आहेत. तर 50 काँग्रेस समाजवादी पक्षाचे (सपा) आहेत. याशिवाय, तीन अपक्ष आमदार पुन्हा रिंगणात आहेत. यापैकी 105 आमदारांच्या संपत्तीत वाढ नोंदवण्यात आली असून, त्यापैकी 59 भाजप आमदार आहेत. काँग्रेसचे 43 आमदार आहेत. इतर सपा आणि अपक्ष आहेत.

182 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार
गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला विधानसभेच्या 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबरला 93 जागांसाठी मतदान होणार आहे. 8 डिसेंबरला निकाल लागणार आहे. यानंतर गुजरातमध्ये पुन्हा कोण सत्तेवर बसणार, हे स्पष्ट होईल. भाजप, काँग्रेस आणि आप हे तिन्ही पक्ष जोरदार निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. आपनेही 29 जागांवर नशीब आजमावले, पण एकाही जागेवर आपले खाते उघडता आले नाही. यंदाच्या निवडणुकीत आप जोरदारपणे निवडणूक लढवत असल्याने ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Five yrs, assets up 721%: Gujarat Home Minister Harsh Sanghavi's financial value balloons, ADR data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.