मुदतवाढ मिळालेल्या कर्मचाऱ्यांना निश्चित वेतन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 02:58 AM2020-12-19T02:58:23+5:302020-12-19T02:58:32+5:30
वित्त मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या व्यय विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन हे त्याने उचलेला शेवटचा पगार आणि त्याचे निवृत्ती वेतन यातील फरकावर आधारित असेल.
नवी दिल्ली : निवृत्तीनंतर कामावर घेण्यात आलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना निश्चित (फिक्सड्) वेतन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढ मिळणार नाही.
वित्त मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या व्यय विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन हे त्याने उचलेला
शेवटचा पगार आणि त्याचे निवृत्ती वेतन यातील फरकावर आधारित असेल. त्यांच्या वेतनात कंत्राट काळात कोणताही बदल होणार नाही. त्यांना प्रवास भत्ता मिळेल तसेच काम केलेल्या प्रत्येक महिन्यासाठी १.५ दिवस पगारी अनुपस्थितीचा लाभ मिळेल.
व्यय विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना कंत्राटी नियुक्त्या देण्याचा प्रघात ठरू नये. सार्वजनिक हितासाठी गरज असेल तेव्हाच अशा नियुक्त्या देण्यात याव्यात. त्या कमीत कमी प्रमाणात राहतील, हे पाहायला हवे.
अशा कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणे कसे गरजेचे आहे, याचा योग्य तपशील नियुक्ती देणाऱ्या प्राधिकरणासमोर ठेवल्यानंतरच नियुक्त्या देण्यात याव्यात.