भारताविरोधात चीनचा वॉटर बॉम्ब; अरुणाचल प्रदेश, आसामसमोर पुराचं संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 10:21 AM2018-10-22T10:21:12+5:302018-10-22T10:23:04+5:30

भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर

flash flood threat in north east india china brahmaputra river arunachal pradhesh assam on high alert | भारताविरोधात चीनचा वॉटर बॉम्ब; अरुणाचल प्रदेश, आसामसमोर पुराचं संकट

भारताविरोधात चीनचा वॉटर बॉम्ब; अरुणाचल प्रदेश, आसामसमोर पुराचं संकट

googlenewsNext

नवी दिल्ली: आसाम आणि अरुणाचल प्रदेशासमोर सध्या पुराचं संकट आ वासून उभं आहे. आसाममधील 10 गावं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. चीनच्या अखत्यारित येणाऱ्या तिबेटमध्ये भूस्खलन झाल्यानं एका नदीचा मार्ग बंद झाला आहे. यामुळे या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार झाला आहे. डोंगराळ भागात भूस्खलन झाल्यानं नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. 

16 ऑक्टोबरला तिबेटमध्ये भूस्खलन झालं. त्यामुळे यारलुंग सांग्पो नदीचा मार्ग बंद झाला. मात्र भूस्खलनामुळे तयार झालेला बांध फुटल्यास साचलेलं पाणी अतिशय वेगात वाहू लागेल. त्यामुळे खालील भागात असलेल्या अरुणाचल प्रदेश आणि आसामला धोका आहे. या नदीला अरुणाचल प्रदेशात सियांग नावानं ओळखलं जातं. तर आसाममध्ये ही नदी ब्रह्मपुत्रा म्हणून परिचित आहे. या नदीचं पाणी सोडण्यास सुरुवात करण्याची आल्याची माहिती चीननं भारताला दिली आहे. या पाण्याचा वेग प्रति सेकंद 18 हजार क्यूबिक मीटर इतका आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावरील भाग पाण्याखाली गेला आहे. आसामच्या धेमाजी, डिब्रूगढ, लखीमपूर, तिनसुकिया आणि जोरहाट जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

सियांग नदीच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती अरुणाचल प्रदेशातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. तिबेटमधील भूस्खलन नैसर्गिक कारणांमुळे झाल्याची माहिती चीनकडून देण्यात आली आहे. मात्र नैसर्गिक आपत्तींचा संदर्भ देऊन चीन भारताचं नुकसान करु शकतो, असा संशय भारतीय यंत्रणांना आहे. चीनकडून अनेकदा सतर्कतेचा इशारा उशीरा दिला जातो. त्यामुळे नुकसान टाळता येणं अवघड होतं. गेल्या वर्षी काझीरंगामध्ये पूर आला होता. त्यात अनेक प्राण्यांनी जीव गमावला होता. या पुराची माहितीदेखील चीननं भारताला उशीरा दिली होती. 

Web Title: flash flood threat in north east india china brahmaputra river arunachal pradhesh assam on high alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.