अपघातानंतर पळून जाणे बेततेय जीवावर, ‘हिट अँड रन’मुळे देशभरात सर्वाधिक मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 07:56 AM2024-01-03T07:56:12+5:302024-01-03T07:57:50+5:30
२०२२ मध्ये ‘हिट अँड रन’मुळे अपघात १७.४%ने वाढले आहेत.
नवी दिल्ली : पाठीमागून धडक दिल्याने आणि ‘हिट अँड रन’ने देशात सर्वाधिक अपघात आणि मृत्यूही होत असल्याचे समोर आले आहे. ‘हिट अँड रन’मुळे २०२२ मध्ये देशभरात ३०,४८६ जणांचा मृत्यू झाला. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
‘हिट अँड रन’ने २०२१ मुळे ५७,४१५ अपघात झाले असून यात २५ हजार ९३८ मृत्यू तर ४५ हजार ३५५ जण जखमी झाले आहेत. २०२२ मध्ये ‘हिट अँड रन’मुळे ६७,३८३ अपघात झाले आहेत. २०२२ मध्ये ‘हिट अँड रन’मुळे अपघात १७.४%ने वाढले आहेत.