भारताचं स्वदेशी बनावटीचं पहिलं विमान एचटीटी 40नं घेतलं उड्डाण
By admin | Published: June 17, 2016 10:17 PM2016-06-17T22:17:24+5:302016-06-17T22:17:24+5:30
भारताचं पहिलं स्वदेशी बनावटीचं प्रशिक्षण विमान हिंदुस्थान टर्बो ट्रेनर-40(एचटीटी )नं आज पहिलं यशस्वी उड्डाण घेतलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 17 - भारताचं पहिलं स्वदेशी बनावटीचं प्रशिक्षण विमान हिंदुस्थान टर्बो ट्रेनर-40(एचटीटी )नं आज पहिलं यशस्वी उड्डाण घेतलं आहे. विमानाचं उड्डाण घेताना संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरही उपस्थित होते.
हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीनं एचटीटी 40 हे विमान विकसित केलं असून, आज सकाळी एचएएल विमानतळावरून यशस्वी उड्डाण घेतलं आहे. एचएएलच्या अधिका-यांच्या मते 25 ते 30 मिनिटांपर्यंत यानं यशस्वी उड्डाण घेतलं आहे.
या विमानाला सेनेच्या तिन्ही दलांचे संरक्षण करण्याच्या उद्देशानं बनवण्यात आलं असून, भारतीय वायुसेनेनं हे विमान बनवण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.