इस्त्रोच्या स्वदेशी बनावटीच्या 'स्पेस शटल'चे उद्या उड्डाण

By admin | Published: May 22, 2016 01:43 PM2016-05-22T13:43:01+5:302016-05-22T13:52:23+5:30

उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी इस्त्रोने तयार केलेल्या अवकाश यानाची ( स्पेस शटल) सोमवारी पहिली चाचणी होणार आहे.

The flight of Istro's indigenous 'Space Shuttle' tomorrow | इस्त्रोच्या स्वदेशी बनावटीच्या 'स्पेस शटल'चे उद्या उड्डाण

इस्त्रोच्या स्वदेशी बनावटीच्या 'स्पेस शटल'चे उद्या उड्डाण

Next

ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. २२ - उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी इस्त्रोने तयार केलेल्या अवकाश यानाची ( स्पेस शटल) सोमवारी पहिली चाचणी होणार आहे. पुर्नवापरायोग्य अवकाश यान तयार करण्याच्या तंत्रज्ञानावर इस्त्रो काम करीत असून, ही चाचणी म्हणजे त्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. 
 
संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन इस्त्रोने ‘आरएलव्ही-टीडी’ हे यान तयार केले आहे. विमानासारखे पंख असलेले या यानाची उद्या श्रीहरीकोटा इथे सतीश धवन अवकाश तळावर चाचणी होणार आहे. उपग्रहाला अवकाशात सोडल्यानंतर यानाला विमानासारखे पृथ्वीवर आणण्याच्या तंत्रज्ञानावर इस्त्रो काम करत आहे. 
 
जेणेकरुन त्या यानाचा पूर्नवापर करता येईल. या तंत्रज्ञानामुळे उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च दहा पटीने कमी होणार आहे. अशा प्रकारच्या यानाच्या अत्याधुनिक आवृत्तीचा मानवी अवकाश मोहिमांसाठी वापर होऊ शकते. आरएलव्ही-टीडी यानाची ही प्राथमिक चाचणी असल्याने हे यान उद्या नियंत्रितपणे बंगालच्या खाडीत उतरवण्यात येईल. 
 
चाचणीचा कालावधी दहा मिनिटांचा असेल. स्वदेशी बनावटीचे पूर्णपणे विकसित पूर्नवापरा योग्य अवकाश यान तयार करण्यासाठी दशकभराचा कालावधी लागेल असे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक के.सिवान यांनी सांगितले. 
 
याआधी अंतराळ तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या अमेरिकेसह इतरही काही देशांनी उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी व अंतराळ सफरींसाठी अशा ‘स्पेस शटल’चा वापर केला. मात्र कालांतराने अपघात व न परवडणाऱ्या आर्थिक गणितामुळे त्यांनी ही कल्पना सोडून दिली किंवा अशा वाहनांचा वापर बंद केला. भारताच्या अभियंत्यांनी काटकसरीवर भर देत रॉकेटच्या पुर्नवापरावर भर दिला आहे. 
 

Web Title: The flight of Istro's indigenous 'Space Shuttle' tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.