Flight Urination Case: आणखी एक घटना; न्यूयॉर्क-दिल्ली विमानात प्रवाशाने केली लघवी, आरोपी ताब्यात...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 09:36 PM2023-04-24T21:36:22+5:302023-04-24T21:36:29+5:30
Flight Urination Case: गेल्या काही दिवसांमध्ये विमानात दारु पिऊन लघवी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
Flight Urination Case: गेल्या काही दिवसांपासून विमानात दारु पिऊन लघवी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता परत एकदा अशीच घटना घडली आहे. अमेरिकेहून भारतात येणाऱ्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशावर लघवी केली. या दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला होता. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर विमान उतरताच त्या मद्यधुंद प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले.
Legal Action has been taken under non-cognizable offences of the Civil Aviation Act. Action initiated after the complaint given by the Airlines' staff about the unruly behaviour of the passenger. There was no corroborating evidence or complaint given by the co-passengers… pic.twitter.com/yPp9Y9bJJT
— ANI (@ANI) April 24, 2023
अमेरिकन एअरलाइनच्या विमानाने न्यूयॉर्कहून उड्डाण घेतले होते. विमान दिल्लीत दाखल होताच मद्यधुंद प्रवाशाला सीआयएसएफने ताब्यात घेतले आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने सांगितले की, पीडित प्रवाशाने या संदर्भात एफआयआर दाखल केला आहे. रविवारी हे विमान न्यूयॉर्कहून दिल्लीला येत असताना ही घटना घडली.
यापूर्वीही अशा घटना घडल्या
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एअर इंडियाच्या विमानात लघवी केल्याची घटना घडली होती. नशेत एका प्रवाशाने महिला प्रवाशावर लघवी केली होती. शंकर मिश्रा नावाच्या प्रवाशाला नंतर अटक करण्यात आली. त्याला न्यायालयीन खटल्यालाही सामोरे जावे लागले. नंतर त्याला जामीन मिळाला. तो न्यूयॉर्कहून दिल्लीला येत असताना त्याने हे कृत्य केले होते.