फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडीलचा जीएसटी कर प्रणालीला विरोध

By admin | Published: February 9, 2017 09:32 PM2017-02-09T21:32:58+5:302017-02-09T21:46:20+5:30

देशातल्या नावाजलेल्या ई-कॉमर्समधल्या ऑनलाइन रिटेल कंपन्या फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अ‍ॅमेझॉननं जीएसटी कायद्याला विरोध दर्शवला आहे.

Flipkart, Amazon, Snapdeal GST tax system | फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडीलचा जीएसटी कर प्रणालीला विरोध

फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडीलचा जीएसटी कर प्रणालीला विरोध

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - देशातल्या नावाजलेल्या ई-कॉमर्समधल्या ऑनलाइन रिटेल कंपन्या फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अ‍ॅमेझॉननं जीएसटी कायद्याला विरोध दर्शवला आहे. जीएसटी मसुद्यातील कर प्रणाली(टीसीएस)च्या नियमांबाबत या कंपन्यांनी चिंता व्यक्त केली आहे. टीसीएस (टॅक्स कलेक्टड अ‍ॅट सोर्स)अंतर्गत बाजारातून विक्रेत्याला मिळणारा फायदा आता सरकारकडे जमा करावा लागणार आहे.

कंपन्यांच्या म्हणण्यानुसार टॅक्स कलेक्टड अ‍ॅट सोर्स या कर प्रणालीमुळे वर्षाला जवळपास 400 कोटी रुपयांचं भांडवल अडकून राहणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांकडून ऑनलाइन विक्रीला अल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. जीएसटीच्या मसुद्याला या महिन्याच्या शेवटी अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. 


फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांच्या मते, आम्ही पूर्ण यंत्रणेत व्यापकता आणली आहे. हजारो आणि कोटींमध्ये आमचे ऑनलाइन विक्रेते आहेत. त्यातील काही जण उद्योजकही आहेत. तसेच काही ऑफलाइन रिटेलरही आहेत. जीएसटी कर प्रणाली लागू केल्यास आमचे क्षेत्र प्रभावित होऊन विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागेल. टीसीएसमुळे जवळपास 400 कोटी रुपयांचे भांडवल अडकणार असून, ते विक्रेत्याला मिळणार नाही. त्यामुळे खेळते भांडवल कमी होईल आणि विक्रेता ऑनलाइन व्यवसाय करण्यापासून टाळाटाळ करेल.

Web Title: Flipkart, Amazon, Snapdeal GST tax system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.