फ्लिपकार्टची एका दिवसात 1400 कोटींची कमाई

By admin | Published: October 5, 2016 09:41 AM2016-10-05T09:41:24+5:302016-10-05T10:08:19+5:30

फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबपोर्टलने एका दिवसात तब्बल 1400 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. फ्लिपकार्टने सोमवारी 1400 कोटींच्या व्यवहाराची नोंद केली आहे.

Flipkart earns 1400 crores a day | फ्लिपकार्टची एका दिवसात 1400 कोटींची कमाई

फ्लिपकार्टची एका दिवसात 1400 कोटींची कमाई

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.5 - फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबपोर्टलने एका दिवसात तब्बल 1400 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. फ्लिपकार्टने सोमवारी 1400 कोटींच्या व्यवहाराची नोंद केली आहे. भारतात एका दिवसात एखाद्या वेबपोर्टलवर इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. नवरात्र, दसरा आणि दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टने 'बिग बिलीयन डेज' अशी टॅगलाइन देऊन विविध वस्तूंवर आकर्षक आणि ग्राहकांच्या खिशाला परवडतील, असा सेल सुरू केला आहे. 
 
आणखी बातम्या
 
या बंपर सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, ज्वेलरीसारख्या निरनिराळ्या वस्तूंवर मोठी सूट मिळत आहे. सणांच्या पार्श्वभूीवर ऑनलाइन शॉपिंग ट्रेंडमध्ये अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांनी बंपर मेगा फेस्टिव्हल सेल ग्राहकांसाठी आयोजित केला आहे. मात्र यात फ्लिपकार्टने एका दिवसात तब्बल 1400 कोटींची कमाई करत बाजी मारली आहे.   
 

Web Title: Flipkart earns 1400 crores a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.