फ्लिपकार्टचे CEO बिन्नी बन्सल यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 07:21 PM2018-11-13T19:21:50+5:302018-11-13T19:22:15+5:30
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी दिला आहे. यासंदर्भात कंपनीने एक निवेदन जारी केले आहे.
नवी दिल्ली: ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी दिला आहे. यासंदर्भात कंपनीने एक निवेदन जारी केले आहे.
बिन्नी बन्सल यांचा फ्लिपकार्ट कंपनीच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत मोठा वाटा आहे. दरम्यान, बिन्नी बन्सल यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात त्यांची वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट कंपनीकडून स्वतंत्र चौकशीही सुरू होती. त्यानंतर बिन्नी बन्सल यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनी फ्लिपकार्टची स्थापना केली होती. गेल्या काही महिन्यांपूर्वी वॉलमार्ट कंपनीने फ्लिपकार्टला खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सचिन बन्सल यांनी फ्लिपकार्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता बिन्नी बन्सल यांनी राजीनामा दिला आहे.