Amazon VS Flipkart अॅमेझॉनशी पंगा नडला; फ्लिपकार्टला 32 अब्जांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 03:59 PM2018-10-29T15:59:24+5:302018-10-29T16:00:02+5:30
जगातील सर्वात मोठी कंपनी फ्लिपकार्टला गेल्या आर्थिक वर्षामध्ये अॅमेझॉनशी स्पर्धा नडली आहे.
बेंगळुरु : जगातील सर्वात मोठी कंपनी फ्लिपकार्टला गेल्या आर्थिक वर्षामध्ये अॅमेझॉनशी स्पर्धा नडली आहे. तब्बल 32 अब्ज रुपयांचे नुकसान झाले असून 2006-17 च्या तुलनेत हे नुकसान 70 टक्क्यांनी जास्त आहे. ही माहिती फ्लिपकार्ट इंडिया आणि फ्लिपकार्ट इंटरनेटच्या नियामक फाईलमधून मिळाली आहे.
रिटेलर कंपनीची घाऊक विक्री करणआरी कंपनी फ्लिपकार्ट इंडियाचे नुकसान 75 पटींनी वाढून 2 हजार कोटी रुपये झाली आहे. तर ऑनलाईन व्यवहार सांभाळणारी कंपनी फ्लिपकार्ट इंटरनेटचे नुकसान 30 टक्क्यांनी घटून 1100 कोटी रुपये झाले आहे. मार्च 2017 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात फ्लिपकार्ट इंडियाचे नुकसान 2016 पेक्षा घटून 244 कोटी रुपये राहिले होते. तर 2016 मध्ये हे नुकसान 545 कोटी झाले होते.
गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या नुकसानीचे खरे कारण कंपनीने अॅमेझॉनशी स्पर्धा करण्यासाठी विपनन आणि डिस्काऊंटचा केलेला वर्षाव आहे. वॉलमार्टने फ्लिपकार्टवर ताबा मिळविल्यानंतर कंपनी आक्रमक झाली आहे. जाणकारांच्या मतानुसार 2020 पर्यंत फ्लिपकार्टला नुकसान होतच राहणार आहे. फ्लिपकार्ट ही वॉलमार्टची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे.