मोबाईल, आयफोन, लॅपटॉप, साडेचार लाखांच्या वस्तू घेऊन फ्लिपकार्टचा डिलिव्हरी बॉय पसार, पोलीस घेताहेत शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 11:38 AM2022-10-07T11:38:15+5:302022-10-07T11:46:51+5:30

ई-कॉमर्स कंपन्या संदर्भात सध्या अनेक बातम्या पाहायला मिळतात. काही ठिकाणी मागवलेली वस्तु न येता वेगळ्याच काहीतरी वस्तु आल्याचे पाहायला मिळत आहे.

Flipkart's delivery boy absconded with goods worth 4 lakhs case has been filed police in Bangalore | मोबाईल, आयफोन, लॅपटॉप, साडेचार लाखांच्या वस्तू घेऊन फ्लिपकार्टचा डिलिव्हरी बॉय पसार, पोलीस घेताहेत शोध

मोबाईल, आयफोन, लॅपटॉप, साडेचार लाखांच्या वस्तू घेऊन फ्लिपकार्टचा डिलिव्हरी बॉय पसार, पोलीस घेताहेत शोध

googlenewsNext

ई-कॉमर्स कंपन्या संदर्भात सध्या अनेक बातम्या पाहायला मिळतात. काही ठिकाणी मागवलेली वस्तु न येता वेगळ्याच काहीतरी वस्तु आल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी एका ग्राहकाला लॅपटॉप ऑर्डर केल्यानंतर घडी साबण आल्याचे समोर आले होते. पण आता फ्लिपकार्डचा डिलिव्हरी बॉय ४ लाखांच्या वस्तु घेऊन फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना बंगळूरु येथील आहे. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयचा शोध सुरू केला आहे.

फ्लिपकार्ट कंपनीचा हा डिलिव्हरी बॉय फोन, लॅपटॉप आणि घड्याळांसह ६१ गॅझेट्ससह फरार झाला आहे. या वस्तु त्याला ग्राहकांना डिलिव्हर करायच्या होत्या. तो अलीकडेच एका ई-कॉमर्स फर्मसाठी डिलिव्हरी बॉईज पुरवणाऱ्या लॉजिस्टिक कंपनीत रुजू झाला होता. या वस्तुंची किंमत ४ लाख रुपये आहे. यामध्ये आयफोन, लॅपटॉप आणि अँड्रॉइड फोनचा समावेश आहे. 

Optical illusion: ससा तो ससा...लपला कसा! चित्रात लपलेले ३ ससे ५ सेकंदात शोधून दाखवा

तो डिलिव्हरी बॉय कंपनीमध्ये रुजू  होता तेव्हा त्याने त्यांची कागदपत्रे जमा केली होती. त्याचे नाव शेख बाबाजान असं आहे. त्याने त्याच्या पत्त्यामध्ये पूर्व बंगळुरूचा रहिवासी असल्याचा दावा केला. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टशी संबंधित लॉजिस्टिक कंपनीचे ऑपरेशनल मॅनेजर अभिलाष यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

आमच्या कंपनीने डिलिव्हरी बॉय या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते.यात नोकरीसाठी बाबाजान याने अर्ज केला होता.२४ सप्टेंबर रोजी त्याने आमच्याशी संपर्क केला. यावळी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक कॅन्सल चेक जमा केला. या कागदपत्रांची आमच्या कंपनीने शाहानीशा केली होती. यानंतर कंपनीने त्यांना नोकरी दिली . २५ सप्टेंबरपासून त्याने कामाला सुरूवात केली. त्याची ड्युटी कनकनगर येथील फ्लिपकार्टच्या युनिटमध्ये होती. पहिल्या दिवशी त्याने ६ ऑर्डर डिलिव्हरी केल्या आणि ग्राहकांकडून मिळालेले पैसे ऑफिसमध्ये जमा केले होते, असं तक्रारीत म्हटले आहे. 

ठाकरे-शिंदे कुटुंबात लग्नसोहळा रंगणार, परवाचा मुहूर्त; दसऱ्यादिवशीच पत्रिका व्हायरल

यानंतर दुसऱ्याच दिवशी बाबाजान याला फ्लिपकार्ट युनिटमधून डिलिव्हरीसाठी ६१ वस्तु दिल्या. पण या वस्तुमधील एकाही वस्तुची डिलिव्हरी ग्राहकांना झाली नाही. कंपनीने त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मोबाईल बंद होता.बाबाजान याला गंगानगर परिसरातील सामान पोहोचवण्याचे काम देण्यात आले होते. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. 

Web Title: Flipkart's delivery boy absconded with goods worth 4 lakhs case has been filed police in Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.