पैशांचा महापूर! तामिळनाडूमधील पोटनिवडणूक रद्द

By Admin | Published: April 10, 2017 07:08 AM2017-04-10T07:08:01+5:302017-04-10T17:37:56+5:30

तामिळानाडूत आरकेनगर विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पैशाच्या प्रचंड वापरामुळे ही निवडणुक प्रक्रिया निवडणूक आयोगाला रद्द

Flood of money! Bye-elections in Tamil Nadu canceled | पैशांचा महापूर! तामिळनाडूमधील पोटनिवडणूक रद्द

पैशांचा महापूर! तामिळनाडूमधील पोटनिवडणूक रद्द

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - पैशाचा होत असलेला वारेमाप वापर ही गेल्या काही काळापासून निवडणुकीमधील सर्वसामान्य बाब बनली आहे. पण तामिळानाडूत आरकेनगर विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पैशाच्या प्रचंड वापरामुळे य़ेथील मतदान  निवडणूक आयोगाला रद्द करावी लागली आहे. या ठिकाणी 12 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार होती. पण तामिळनाडूमधील निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर निवडणूक अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. 
प्रतिष्ठेच्या झालेल्या या पोटनिवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे आणि भेटवस्तूंचा वारेमाप वारर केला गेला. त्यामुळे निवडणुकीता निष्पक्षपातीपणा संपुष्टात आला होता. आता या सर्वांचा प्रभाव संपुष्टात आल्यावर योग्यवेळी मतदान घेतले जाईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले. 
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर या मतदार संघातील जागा रिक्त झाली होती. दरम्यान, निवडणूक प्रचारादरम्यान तामिळनाडूचे मंत्री सी. विजयभास्कर यांच्या एका सहकाऱ्याच्या घरातून 89 कोटी रुपये मिळाले होते. विजय भास्कर हे एआयडीएमकेच्या शशिकला गटाचे उमेदवार टीटीव्ही दिनकरन यांचे विश्वासू मानले जातात. या पोटनिवडणुकीत मतदारांना  आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची आमिषे दाखवण्यात येत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. त्यात मोबाईल रिचार्जपासून वर्तमान पत्राच्या बिलांपर्यंतची आमिषे दाखवली गेली. निवडणूक आयोगाने देखरेखीसाठी मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्ग तैनात केल्यानंतरही हे गैरप्रकार रोखणे अवघड झाले होते.  

Web Title: Flood of money! Bye-elections in Tamil Nadu canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.