Assam floods: आसाममध्ये महापूर! २१ लाखांहून अधिक लोकांना बसला मोठा फटका, ६२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 01:47 PM2024-07-05T13:47:30+5:302024-07-05T14:01:04+5:30

Assam floods: पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. परिस्थिती सतत बिघडत असताना गुरुवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. राज्यातील २९ जिल्ह्यांतील २१ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे.

flood situation worsens in assam more than 21 lakh people affected many animals died in kaziranga | Assam floods: आसाममध्ये महापूर! २१ लाखांहून अधिक लोकांना बसला मोठा फटका, ६२ जणांचा मृत्यू

Assam floods: आसाममध्ये महापूर! २१ लाखांहून अधिक लोकांना बसला मोठा फटका, ६२ जणांचा मृत्यू

आसाममध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. परिस्थिती सतत बिघडत असताना गुरुवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. राज्यातील २९ जिल्ह्यांतील २१ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. अधिकृत बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. बुलेटिननुसार, राज्यातील प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. 

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या रिपोर्टनुसार, जीव गमावलेल्या सहा लोकांपैकी चार गोलाघाटचे रहिवासी होते तर दिब्रुगड आणि चराईदेवमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, यावर्षी पूर, भूस्खलन आणि वादळामुळे मृतांची संख्या ६२ वर पोहोचली आहे. २९ जिल्ह्यांतील एकूण २११३२०४ लोकांना पुराचा फटका बसला आहे, तर ५७०१८ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. 

रिपोर्टनुसार, सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये धुबरीचा समावेश आहे, जिथे ६४८८०६ लोक प्रभावित झाले आहेत. तर दरांगमध्ये १९०२६१, कछारमध्ये १४५९२६, बारपेटा येथे १३१०४१ आणि गोलाघाटमध्ये १०८५९४ लोकांना पुराचा फटका बसला आहे. सध्या ३९,३३८ बाधित लोक ६९८ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. बुलेटिननुसार, विविध एजन्सींनी बोटींचा वापर करून एक हजारांहून अधिक लोक आणि ६३५ प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.

कामरूप (महानगर) जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे, जेथे ब्रह्मपुत्र, दिगारू आणि कोलोंग नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. काझीरंगामध्ये आतापर्यंत ३१ प्राण्यांचा बुडून मृत्यू झाला असून ८२ जणांना पुराच्या पाण्यातून वाचवण्यात यश आलं आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. 

अधिकाऱ्याने सांगितले की, २३ हरणांचा बुडून मृत्यू झाला तर १५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वन अधिकाऱ्यांनी इतर प्राण्यांसह ७३ हरीण, सांबर आणि एक स्कोप उल्लू यांची सुटका केली आहे. सध्या २० जनावरांवर उपचार सुरू आहेत तर ३१ इतर प्राण्यांना उपचारानंतर सोडण्यात आलं आहे असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. 
 

Web Title: flood situation worsens in assam more than 21 lakh people affected many animals died in kaziranga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.