आसाममध्ये पूरस्थिती गंभीर
By admin | Published: August 21, 2015 10:34 PM2015-08-21T22:34:30+5:302015-08-21T22:34:30+5:30
भूतान आणि अरुणाचल प्रदेशच्या किनारपट्टी भागात संततधार पावसामुळे आसाममधील पूरस्थिती शुक्रवारी अधिक गंभीर झाली. १३ जिल्ह्यांतील तीन
गुवाहाटी : भूतान आणि अरुणाचल प्रदेशच्या किनारपट्टी भागात संततधार पावसामुळे आसाममधील पूरस्थिती शुक्रवारी अधिक गंभीर झाली. १३ जिल्ह्यांतील तीन लाखावर लोकांना याचा फटका बसला असून अनेक ठिकाणी भूपृष्ठ संपर्क तुटला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आसाममधील पूर परिस्थितीचा आढावा घेतला आणि बचाव व मदतकार्यात केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.
जलस्रोत विभागाने दिलेल्या माहितीनुसार धेमाजी, लखीमपूर, कोक्राझर, बोंगाईगाव, चिरांग, बारपेटा, जोरहट, बस्का, सोनितपूर आणि दिब्रूगढ या जिल्ह्यांतून वाहणाऱ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जोरहटच्या नेमाटीघाट आणि दिब्रूगढमध्ये ब्रह्मपुत्रा नदी फुगली असून इतर जिल्ह्यातही ती ओसंडून वाहत आहे. कर्बी आंगलोंग जिल्ह्यात काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा बहुतांश भाग पाण्याखाली आल्याने तेथील वन्यजीवांनी जवळच्या डोंगरांवर आश्रय घेतला आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. (वृत्तसंस्था)