बिहारमधील  पूरस्थिती बिकट, मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 10:18 PM2017-08-14T22:18:47+5:302017-08-14T22:23:46+5:30

नेपाळमधील मैदानी भाग आणि सीमांचलमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे  बिहारमधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे पूर्णिया किशनगंज, कटिहार, अररिया, दरभंगासह एकूण १८ जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे.

The floods in Bihar are tough, the army calls for help | बिहारमधील  पूरस्थिती बिकट, मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण

बिहारमधील  पूरस्थिती बिकट, मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण

googlenewsNext

पाटणा, दि. १४ - नेपाळमधील मैदानी भाग आणि सीमांचलमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे  बिहारमधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे पूर्णिया किशनगंज, कटिहार, अररिया, दरभंगासह एकूण १८ जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. या जिल्ह्यांमधील दूर्गम भागात वसलेल्या गावांमध्ये परिस्थिती अधिकच खराब झाली आहे. तसेच परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. या पुरस्थितीमुळे सुमारे एक कोटी नागरिकांना फटका बसला आहे. 
गेल्या काही दिवसांपासून बिहार आणि नेपाळच्या सीमेलगतच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच नेपाळकडून धरणांमधील पाणी सोडण्यात येत असल्याने परिस्थिती अधिकच बिघडली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारकडून लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली आहे. तसेच हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्तांसाठी खाद्यान्नाची पॅकेट टाकण्यात येत आहेत. 
 या पूरस्थितीबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, "पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू  आहे. आम्ही उद्या आपातकालीन विभाग, रस्तेबांधणी विभाग आणि ग्रामीण कार्य विभागाचे मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवणार आहोत." तसेच पुराचा फटका बसलेल्यांसाठी मदत आणि भोजन केंद्रेही सुरू केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील रणनीती ठरवण्यासाठी आम्ही एक बैठक बोलावली आहे. तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके सीतामढी, मधुबनी आणि चंपारण्य जिल्ह्यात पाठवण्यात आली आहेत. 
दरम्यान, केंद्र सरकारने पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राज्य सरकारला दिले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांच्याशी राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा केली आहे.  

Web Title: The floods in Bihar are tough, the army calls for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.