फुलपूर, गोरखपूरमध्ये सपाला पाठिंबा नाही! पोटनिवडणुकीसंदर्भात मायावतींची स्पष्टोक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:30 IST2018-03-05T01:30:54+5:302018-03-05T01:30:54+5:30
उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी समाजवादी पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे बहुजन समाजे पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी स्पष्ट केले.

फुलपूर, गोरखपूरमध्ये सपाला पाठिंबा नाही! पोटनिवडणुकीसंदर्भात मायावतींची स्पष्टोक्ती
लखनौ - उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी समाजवादी पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे बहुजन समाजे पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी स्पष्ट केले.
११ मार्च रोजी दोन्ही मतदारसंघांत मतदान होऊन १४ मार्च रोजी मतमोजणी होईल. रविवारी दुपारी बसपचे प्रभारी घनशाम चंद्र खारवर यांनी प्रवीण कुमार निशाद (गोरखपूर) आणि नागेंद्र सिंह पटेल (फुलपूर) यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र मायावती यांनी ही शक्यता फेटाळून लावली.
मात्र, त्यांनी येत्या काळात होणा-या राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यासाठी येत्या काळात नवा फॉर्म्युला तयार करण्यात येईल, असेही मायावती म्हणाल्या. (वृत्तसंस्था)
२ जागांची लढाई
विधानसभा निवडणुकीत भाजपाने मित्रपक्षांसह राज्यात ४०३ पैकी ३२५ जागा जिंकल्या होत्या. गोरखपूर मतदार संघातून निवडून आलेले योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री बनल्यामुळे तर केशव प्रसाद मौर्य हे उपमुख्यमंत्री बनल्यामुळे त्यांना फुलपूर लोकसभा मतदार संघाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे या पोटनिवडणुका होत आहेत. योगी व मौर्य हे विधान परिषदेवर निवडून गेले आहेत.