महाराष्ट्रातील २ परिचारिकांना ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 09:31 AM2021-09-17T09:31:05+5:302021-09-17T09:33:11+5:30
महाराष्ट्रातील दोन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील दोन परिचारिकांना बुधवारी सायंकाळी राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आला.
यावेळी राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याणमंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय राज्य आरोग्य तथा कुटुंब कल्याणमंत्री डॉ. भारती पवार यां उपस्थिती होती.
जळगाव जिल्ह्यातील खुर्द येथील उपकेंद्रातील प्रेमलता संजय पाटील या परिचारिका आहेत. मागील १४ वर्षांपासून त्या आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. श्रीमती पाटील महिलांना समुपदेशन करण्याचे काम उत्तम पार पाडतात. जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील आंतर रुग्ण विभागाच्या परिचारिका शालिनी नाजुकराव कुमरे यांनाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा परिचारिका क्षेत्रातील ३५ वर्षांचा अनुभव आहे.