फुलांचे भाव कोसळले

By admin | Published: October 30, 2016 10:46 PM2016-10-30T22:46:45+5:302016-10-30T22:46:45+5:30

फुलांचे भाव कोसळले

Flowers prices collapsed | फुलांचे भाव कोसळले

फुलांचे भाव कोसळले

Next
लांचे भाव कोसळले
ओझर-या वर्षीच्या फुलांनी सर्वांची दिवाळी केली असली तरीही उत्पादकांवर मात्र संक्र ात ओढवली आहे.यंदा दसरा आणि दिवाळीत फुलांच्या दरांनी शेतकरी कमालीचा हैराण तर झालंच आहे पण त्याच्यावर हजारो रु पयांचा माल रस्त्यांवर फेकून देण्याची वेळ आली आहे.सर्वात जास्त मागणी असलेल्या झेंडू च्या फुलांनी बाजार ओसंडून वाहत असताना भाव मात्र प्रति कॅरेट ३०रूपये व आल्यामुळे भाड्याच्या खर्च देखील खिशातून भरण्याची वेळ आज शेतकर्यांवर अली आहे.पंधरा दिवसांपूर्वी हीच परिस्थिती असताना दिवाळीत तरी भाव चांगले भेटतील ह्या आशेने अनेकांनी फुलांच्या उत्पादनावर भर दिला परंतु यंदा झालेला समाधनकारक पाऊस आणि वातावरण देखील फुलांना अनुकूल असे होते परिणामी उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर झाले आणि मागणी आहे तितकीच राहिल्याने भाव हे पत्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळले असून एकरी२० हजार रु पये खर्च असताना उत्पादन मात्र ५ हजार देखील नाही सांगा दिवाळी कशी साजरी करावी हा यक्ष प्रश्न सध्या शेतकर्यांसमोर आहे.आधीच कांदा टमाटे व अन्य भाजीपाल्याला भाव नसल्याने बर्याच शेतकर्यांनी फुल शेती कडे आपला काल वळवला होता परंतु त्यात देखील अपयश आले आहे.काही जाणकारांच्या माते ह्या वर्षी फुलांना चांगल्या प्रकारे बाजार भाव भेटतील असे वाटले परंतु संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस चांगला झाला आणि भाजीपाल्याला जोड उत्पादन म्हणून अनेकजण फुल शेती करायला लागले परंतु मागील दोन दशकांचा सर्वात नीचांक भाव यंदा च्या वर्षी मिळाला.आता पर्यंत शेकड्याने फुलं हि विकली जात होती व नोकरदार वर्ग हा रेडिमेड हार घेत होता त्यात बर्यापैकी कमाई भेटून जात परंतु कॅरेट चे भाव यंदा २५-३०रु आल्याने अवघ्या१ रु प्रतिकिलो दराने फुल भेटायला लागले त्यात जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपर्यतून शेतकरी आल्याने स्पर्धा अजून तीव्र झाली ह्यात अनेक कारणं असली तरी देखील झालेल्या नुकसानीला हातभार कसा लावायचा ह्या विचारात उत्पादक शेतकरी पडलाय.
बाजारात आलेले झेंडु चे विविध प्रकार कलकत्ता,अष्टगंध,इंडिका,ईनवा(लाल)हे सर्व प्रकार प्रति कॅरेट२५ते ३० रूपये.
शेवंती चे प्रकार व दर
पिवळी-८० रूपये
सफेद-१५० रूपये
रत्नम-६० रूपये.

Web Title: Flowers prices collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.