'फ्लायओव्हर बाबा'! महाकुंभ मेळ्यामध्ये उड्या मारून घेताहेत दर्शन, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:59 IST2025-02-18T14:58:13+5:302025-02-18T14:59:28+5:30
Flyover Baba Video: यावेळच्या महाकुंभमध्ये अनेक बाबा चर्चेत आले. आता एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे.

'फ्लायओव्हर बाबा'! महाकुंभ मेळ्यामध्ये उड्या मारून घेताहेत दर्शन, व्हिडीओ व्हायरल
Flyover Baba News: श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात पुसटशी रेषा असते. श्रद्धा विश्वासाच्या आधारावर वृद्धिंगत होत असते, तर अंधश्रद्धेला ना डोकं असतं ना, पाय... हे सांगण्याचं कारण म्हणजे महाकुंभमध्ये चर्चेत आलेला फ्लायओव्हर बाबा! एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडीओची चर्चा होत असून, अनेकजण यावर बोलत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अंधश्रद्धेतून लोकानुय करणाऱ्या गर्दीचे अनेक व्हिडीओ तुम्ही बघितले असतील. पण, महाकुंभमधील हा व्हिडीओ बघून तुम्हालाही काही प्रश्न पडू शकतो की, हे काय आहे?
फ्लायओव्हर बाबा, व्हिडीओमध्ये काय?
महाकुंभमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक यूजर्संनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका रोहित उपाध्याय नावाच्या एका व्यक्तीनेही हा व्हिडीओ शेअर केला असून, त्याने हा व्हिडीओ प्रयागराजमधील अल्लापूर फ्लायओव्हरचा असल्याचे सांगितले.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, फ्लायओव्हरच्या खालून भाविक जात आहेत. त्याच दरम्यान काही भाविक उड्या मारून उड्डाण पूलाचे दर्शन घेत आहेत. फ्लायओव्हरच्या छताला हात लावून पाया पडत आहेत. तर काही महिला उड्डाणपूलाच्या बाजूच्या भिंतीला स्पर्श करून दर्शन घेत आहेत.
काही लोक उड्डाणपूलाचे दर्शन घेताना बघून इतर लोकही दर्शन घेऊ लागतात. त्यामुळे फ्लायओव्हर बाबा म्हणून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या असून, एका यूजरने म्हटले आहे की, 'हा उड्डाणपूल त्यांच्यावर कोसळू नये म्हणून ते प्रार्थना करत आहेत. हा नवा भारत आहे, थांबणार नाही.'