अर्थमंत्री निर्मला सीतारमण ७व्यांदा सादर करणार अर्थसंकल्प; Live कुठे पाहता येणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 07:54 AM2024-07-23T07:54:12+5:302024-07-23T07:54:25+5:30

Budget 2024 date and time : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

FM Nirmala Sitharaman will present general budget today know where and when you watch live streaming | अर्थमंत्री निर्मला सीतारमण ७व्यांदा सादर करणार अर्थसंकल्प; Live कुठे पाहता येणार? जाणून घ्या

अर्थमंत्री निर्मला सीतारमण ७व्यांदा सादर करणार अर्थसंकल्प; Live कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Union budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या आज सकाळी ११ वाजता संसदेत २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारमन या सलग सातव्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. १ फेब्रुवारी २०२४ नंतर या वर्षात येणारा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्र्यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता आणि आता सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा हा अकरावा अर्थसंकल्प असेल. पण तुम्हाला हा अर्थसंकल्प लाइव्ह कुठे आणि कधी बघता येईल? जाणून घेऊया...

मध्यमवर्गीय, करदाते, शेतकरी, महिला, व्यापारी आणि पगारदार वर्गाला तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या या पहिल्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. निर्मला सीतारमन पुन्हा एकदा लोकसभेत, संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, सकाळी ११ वाजता त्यांच्या शैलीत अर्थसंकल्प मांडतील. काही अर्थतज्ज्ञांचे मते नवीन पेन्शन प्रणाली आणि आयुष्मान भारत यांसारख्या सामाजिक सुरक्षा संबंधित योजनांबाबत सर्वसाधारण अर्थसंकल्पात काही घोषणा होऊ शकतात.

अर्थसंकल्प कधी आणि किती वाजता सादर केला जाईल?
तारीख- मंगळवार, २३ जुलै २०२४

वेळ : सकाळी ११ वाजल्यापासून.

अर्थसंकल्पीय भाषण लाइव्ह कुठे पाहू शकता?

तुम्ही अनेक प्लॅटफॉर्मवर केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ च्या भाषणाचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. संसद टीव्ही आणि दूरदर्शनवर बजेटचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच, तुम्ही संसद टीव्ही आणि दूरदर्शनच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवरही ते ऑनलाइन पाहू शकता. वित्त मंत्रालय त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.finmin.nic.in वर देखील याचे लाइव्ह स्ट्रीमिंग करणार आहे. तसेच थेट प्रक्षेपण वित्त मंत्रालयाच्या https://x.com/FinMinIndia च्या ट्विटर अकाउंटवर देखील पाहू शकता. यासोबत केंद्रीय अर्थसंकल्प २०२४चे लाइव्ह अपडेट लोकमत मनीवर वाचू शकता.

अर्थसंकल्पाची संपूर्ण प्रत कुठे मिळेल?

केंद्रीय अर्थसंकल्पाची संपूर्ण प्रत अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या सादरीकरणानंतर ऑनलाइन उपलब्ध केली जाईल. तुम्ही ही कागदपत्रे सरकारच्या अधिकृत वेबसाइट www.indiabudget.gov.in वर हिंदी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये वाचू शकता.
 

Web Title: FM Nirmala Sitharaman will present general budget today know where and when you watch live streaming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.