CoronaVirus News : मोदी सरकार 3 लाख कोटींच्या पॅकेजची करू शकते घोषणा; नोकरदारांना मिळणार दिलासा?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 03:18 PM2020-05-12T15:18:42+5:302020-05-12T15:23:32+5:30

शाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकार प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करू शकते. 

FM Sitharaman may soon announce massive Rs 3 lakh crore stimulus package vrd | CoronaVirus News : मोदी सरकार 3 लाख कोटींच्या पॅकेजची करू शकते घोषणा; नोकरदारांना मिळणार दिलासा?

CoronaVirus News : मोदी सरकार 3 लाख कोटींच्या पॅकेजची करू शकते घोषणा; नोकरदारांना मिळणार दिलासा?

Next
ठळक मुद्देकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण देशाच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी 3 लाख कोटींचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर करू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यापर्यंत याची घोषणा होण्याची शक्यता आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकार प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करू शकते. 

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण देशाच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी 3 लाख कोटींचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर करू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यापर्यंत याची घोषणा होण्याची शक्यता आहे. सरकारने पहिल्या टप्प्यात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला, तो 25 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीपर्यंत वाढविण्यात आला, जो 3 मेपर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात तो 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक कामे पूर्णपणे बंदावस्थेत आहेत. परंतु मेच्या पहिल्या आठवड्यात काही उद्योगांना सुरुवात करण्याची सशर्त परवानगी मिळाली आहे. भारत ही आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकार प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करू शकते. 

मनी कंट्रोलने बिझनेस स्टँडर्डचा हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. सरकारी कर्ज आर्थिक वर्ष 2021साठी 7.8 लाख कोटी रुपयांवरून 12 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याच्या सरकार निर्णय घेणार असून, येणाऱ्या पैशांतूनच प्रोत्साहन पॅकेज दिली जाण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्था हळूहळू खुली झाल्यामुळे सरकारला लघु उद्योगांना मदत करण्याची इच्छा आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या अखेरीस येणारं नवं पॅकेज मागील 1.7 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजपेक्षा बरेच मोठे असणार आहे. 

नोकरदारांसाठी होऊ शकते मोठी घोषणा- रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पुढील नवं पॅकेज देशातील गरीब घटक आणि नोकरी गमावलेल्या लोकांसाठी दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. छोट्या-मोठ्या कंपन्यांना करमुक्ती व इतर उपाययोजनांद्वारे दिलासा मिळू शकतो. दोन वरिष्ठ अधिका-यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.

(१) MSMEसाठी कार्यशील भांडवल कर्जाच्या योजनेची घोषणा होऊ शकते.
(२) थेट लाभ हस्तांतरण योजने(डीबीटी)चा विस्तार होऊ शकतो. याचा अर्थ सामान्य लोकांच्या खात्यात जास्त पैसे येऊ शकतात.
(३) मनरेगाची देयके म्हणजेच वेतनात वाढ होऊ शकते.
(४) पंतप्रधान किसान योजनेंतर्गत नवीन घोषणा देखील होऊ शकतात.
(५) विमान चालन, पर्यटन, प्रवास आणि वाहन या पॅकेजअंतर्गत मोठ्या घोषणा देखील होऊ शकतात.

लघु उद्योगांना मदत करण्यासाठी जगभरातील सरकारे मदत पॅकेजेस देत आहेत. पे-चेक प्रोटेक्शन प्रोग्राम अंतर्गत नवीन कर्ज देण्यासाठी 320 अब्ज डॉलर्सची तरतूद करणार असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. त्याअंतर्गत अशा कंपन्यांचे कर्ज माफ केले जाईल, जे त्यांच्या कर्मचार्‍यांना किमान आठ आठवडे पगारावर ठेवतात. त्याचप्रमाणे फिलिपिन्स सरकारने छोट्या उद्योगांना 69 दशलक्ष डॉलर्सची मदतही दिली आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

International Nurses Day 2020 : ...म्हणून 'या' राज्यातील नर्सना आहे जगभरात पसंती

CoronaVirus News : येत्या दोन ते तीन दिवसांत सरकार नवं पॅकेज देणार, नितीन गडकरींचं मोठं विधान

CoronaVirus : निसर्गाचा चमत्कार! बिजनौरहून स्पष्ट दिसतोय नैनितालचा पर्वत

चीनच्या हेलिकॉप्टर्सची LACच्या हद्दीत घुसखोरी, भारतीय IAF लढाऊ विमानांनी लावलं हुसकावून

दोन माजी पंतप्रधानांविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह लिहिल्यानं भाजपाच्या संबित पात्रांविरोधात गुन्हा दाखल

भारतीय जवानांशी सिक्कीममध्ये भिडल्यानंतर चीननं दिली अशी प्रतिक्रिया

लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा

CoronaVirus News : चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

Web Title: FM Sitharaman may soon announce massive Rs 3 lakh crore stimulus package vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.