प्रेक्षकांना थिएटरकडे वळविण्यावर भर

By Admin | Published: November 15, 2015 09:13 PM2015-11-15T21:13:47+5:302015-11-15T21:13:47+5:30

तयारी सुरु : ५५ वी राज्य नाट्य स्पर्धा

Focusing on the audience to divert the theater | प्रेक्षकांना थिएटरकडे वळविण्यावर भर

प्रेक्षकांना थिएटरकडे वळविण्यावर भर

googlenewsNext
ारी सुरु : ५५ वी राज्य नाट्य स्पर्धा
जळगाव - राज्य नाट्य स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी सोमवार पासून प्रयत्न करण्यात येणार आहे. स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. स्पर्धक संस्थांकडून सराव सुरु आहे. स्पर्धक नाट्य संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे नाट्य स्पर्धा केंद्राचे समन्वयक विनोद ढगे यांनी सांगितले.
५५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे आयोजन १९ पासून येथील जिल्हा बँक सभागृहात करण्यात आलेे आहे. संमेलनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. संमेलनाचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे,अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात व अखिल भारतीय राज्य नाट्य परिषदेचे कार्यकारी सदस्य श्रीपाद जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
प्रेक्षकांना आकर्षित करणार
राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग घेणारेच स्पर्धक नाटकांचा व स्पर्धेचा आनंद घेतात. मात्र या स्पर्धा संबंधात प्रेक्षकांमध्ये जनजागृती करुण प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केंद्रातर्फे सोमवार पासून करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये फलक लावून जनजागृती करुण पेक्षकांना नाट्यगृहाकडे आकर्षित करण्यावर अधिक जोर देण्यात येणार आहे.
तयारी युद्धस्थरावर
दरम्यानच्या काळत सुट्या असल्याने सोमववार पासून नाट्य स्पधेसाठी आमंत्रित मान्यावरांच्या निमंत्रणाची तयारी सोमवारपासून करण्यात येणार आहे. इतर तयारी पूर्ण झाली आहे. काही बांबींसाठी युद्धस्थरावर प्रयत्न सुरु आहे. स्पर्धक संस्थांना दरम्यानच्या काळात काही अडचणी होत्या त्या सोडविणे व त्यांच्याशी चर्चा करुण समन्वय साधुन समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
स्पर्धकांची तयारी
स्पर्धक व स्पर्धक संस्थांकडून आपपाल्या स्थरावर संस्थेच्या कार्यालय व विविध सभागृहांमध्ये आपल्या नाटकांची जैयत तयारी व रंगीत तालीम सुरु आहे. स्पर्धकांकडून पूर्ण क्षमतेने प्रयत्न सुरु आहे. शहरातील पत्रकार भवन, आयएमआर महाविद्यालय, एम.जे.महाविद्यालय, ललीत कला केंद्र (सागर नगर) सह विविध ठिकाणी स्पर्धकांकडून तयारी सुरु आहे.
१९ नाटकांची मेजवाणी
या वर्षी राज्य नाट्य स्पर्धेसाठी जिल्‘ातून १९ नाट्य प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. आकर्षक नाटके प्रेक्षांकांपर्यंत पोहचणार आहेत. सर्वच नाटक व स्पर्धक चुरशीचे असणार आहेत. स्पर्धांमध्ये जुने जाणते व नविन स्पर्धकांचा समावेश आहे. वेग वेगळ्या विषयांची मांडणी या निमित्ताने स्पर्धक करणार आहे. स्पर्धेत जळगाव, भुसावळ व नंदुबारहुन प्रवेशिका दाखल झाल्या आहेत.
.......(जोड आहे).

Web Title: Focusing on the audience to divert the theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.