चारा घोटाळा : लालूंना आणखी पाच वर्षे शिक्षा , तिस-या प्रकरणातही दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 04:02 AM2018-01-25T04:02:08+5:302018-01-25T04:02:25+5:30

कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्याशी संबंधित तिस-या खटल्यातही बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आणखी एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही ५ वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे.

 Fodder scam: Lalu gets punishment for another five years, convicted in the third case | चारा घोटाळा : लालूंना आणखी पाच वर्षे शिक्षा , तिस-या प्रकरणातही दोषी

चारा घोटाळा : लालूंना आणखी पाच वर्षे शिक्षा , तिस-या प्रकरणातही दोषी

Next

रांची : कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्याशी संबंधित तिस-या खटल्यातही बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आणखी एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही ५ वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे.
चैबासा कोषागारातून १९९० मध्ये बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपये ३७.६२ कोटी परस्पर काढल्याप्रकरणी यादव व मिश्रा यांना ५ वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा, तसेच लालू प्रसादना १० लाख रुपये, तर मिश्रा यांंना ५ लाख रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे. आधीच्या चारा घोटाळ्यात शिक्षा सुनावल्यापासून लालू २३ डिसेंबरपासून तुरुंगात आहेत. दंड न भरल्यास लालू व मिश्रा यांना आणखी एक वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल.
या प्रकरणात आणखी ३ माजी आमदार व १ मंत्री यांनाही दोषी ठरविले असून, त्यांनाही शिक्षा व दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय ३ माजी प्रशासकीय अधिकारीही दोषी ठरले आहेत. मात्र, पशुसंवर्धन विभागाचे दोन अधिकारी व चारा पुरवठादारांची न्यायालयाने निर्दोष
मुक्तता केली.
या खटल्यात एकूण ७६ आरोपी होते. पैकी १४ जणांना मृत्यू झाला असून, २ आरोपींना साक्षीपुराव्याआधारे दोषी ठरविण्यात आले आहे, तर ३ आरोपी माफीचे साक्षीदार बनले आहेत. १ आरोपी अद्याप फरार आहे. (वृत्तसंस्था)
आव्हान देणार-
निकालानंतर तेजस्वी यादव म्हणाले की, आम्ही निकालाला हायकोर्टात व प्रसंगी सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ . बिहारची जनता लालू प्रसाद यांना नेता मानत असल्याने, नितीश कुमार आणि भाजपा त्यांना विविध प्रकरणांत अडकावत आहे.

Web Title:  Fodder scam: Lalu gets punishment for another five years, convicted in the third case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.