दिल्लीत धुक्याची चादर

By admin | Published: January 4, 2017 02:38 AM2017-01-04T02:38:06+5:302017-01-04T02:38:06+5:30

अतिशय दाट धुक्याने मंगळवारी सकाळी दिल्लीला वेढून टाकल्यामुळे दोन विमानांचे उड्डाण रद्द करावे लागले तर दहा विमानांच्या उड्डाणांना व ५५ रेल्वे गाड्यांना उशीर झाला.

Fog sheet in Delhi | दिल्लीत धुक्याची चादर

दिल्लीत धुक्याची चादर

Next

नवी दिल्ली : अतिशय दाट धुक्याने मंगळवारी सकाळी दिल्लीला वेढून टाकल्यामुळे दोन विमानांचे उड्डाण रद्द करावे लागले तर दहा विमानांच्या उड्डाणांना व ५५ रेल्वे गाड्यांना उशीर झाला. राजधानी दिल्लीतील किमान तापमान या हिवाळ््यात ९.५ अंश सेल्सियस एवढे नोंदले गेले. सकाळी साडेआठ वाजता सफदरगंज आणि पालम विमानतळावर दृश्यमानता ही ५० मीटरपेक्षाही कमी नोंदली गेली त्यामुळे विमानांची उड्डाणे व रेल्वेंच्या येण्या-जाण्यावर परिणाम झाला. दृश्यमानता किमान पातळीच्याही खाली गेल्यानंतर दिल्ली विमानतळावरील विमानांच्या वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. दोन उड्डाणे रद्द करावी लागली तर दहा उड्डाणांना उशीर झाला. अतिशय दाट धुके धावपट्टीवर पसरलेले होते, असे विमानतळ सूत्रांकडून समजते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

बर्फवृष्टीमुळे काश्मीरमधील पर्यटकांमध्ये आनंद
काश्मीरमधील पाच महिन्यांचा प्रदीर्घ कोरड्या हवामानाचा टप्पा मंगळवारी गुलमर्गसह अति उंचीवरील भागात बर्फवृष्टी होताच व बहुतांश सपाट भागात पाऊस झाल्यामुळे संपुष्टात आला. गेल्या चार दशकांत एवढा प्रदीर्घ काळ हवामान कोरडे राहण्याची ही पहिलीच वेळ होती.
अतिशय थंडीने त्रासलेल्या लोकांना बर्फवृष्टी आणि पावसामुळे मोठा दिलासा मिळाला कारण ढगांच्या आच्छादनामुळे तापमान अनेक अंशांनी वर चढले होते. गुलमर्ग येथील प्रसिद्ध स्की रिसॉर्टवर मंगळवारी पहाटे साधारणत: पाच इंचांची बर्फवृष्टी झाली.
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गुलमर्ग येथे आले असून त्यांच्यासाठी ही बर्फवृष्टी आनंदाची पर्वणी ठरली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले, खिलनमर्ग, कोंगदुरी आणि अप्पेरवाथसह रिसॉर्टच्या परिसरात जवळपास एक फूट उंचीचा बर्फ साचला आहे.

Web Title: Fog sheet in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.