किती अन् काय बोलायचे याची मर्यादा पाळा, भाजपाच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:42 AM2019-03-25T01:42:39+5:302019-03-25T01:43:50+5:30
भाजपाने उमेदवारांना निर्देश दिले आहेत की, निवडणुकीत हे लक्षात ठेवा की, किती बोलायचे आहे आणि काय बोलायचे आहे? निवडणुकीवर नकारात्मक परिणाम होईल, असे काहीही बोलू नका, असेही उमेदवारांना स्पष्ट सांगण्यात आले आहे.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : भाजपाने उमेदवारांना निर्देश दिले आहेत की, निवडणुकीत हे लक्षात ठेवा की, किती बोलायचे आहे आणि काय बोलायचे आहे? निवडणुकीवर नकारात्मक परिणाम होईल, असे काहीही बोलू नका, असेही उमेदवारांना स्पष्ट सांगण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की, उमेदवारांना सांगण्यात आले आहे की, प्रमुख मुद्द्यांमध्ये चौकीदार, स्वच्छता अभियान, रेकॉर्ड शौचालय उभारणे, शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना यांचा समावेश असावा. याशिवाय सर्वात मोठा मुद्दा सर्जिकल स्ट्राइकचा आहे. प्रत्येक उमेदवाराने आपल्या मतदारसंघात हा मुद्दा उपस्थित करावा. लोकांकडूनही घोषणाबाजी करून घ्यावी.