सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करा : ऋषिकेश कोराणे
By admin | Published: January 21, 2017 02:11 AM2017-01-21T02:11:06+5:302017-01-21T02:11:06+5:30
सरवडे : दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहन अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालविल्यास अपघातापासून दूर राहता येते. सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळूनच वाहन चालविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे मोटारवाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे यांनी केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर व बिद्री सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कारखान्याच्या वाहन अड्ड्यातील अनेक वाहनांवर रिप्लेक्टर बसविण्यात आले.
Next
स वडे : दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहन अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालविल्यास अपघातापासून दूर राहता येते. सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळूनच वाहन चालविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे मोटारवाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे यांनी केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर व बिद्री सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कारखान्याच्या वाहन अड्ड्यातील अनेक वाहनांवर रिप्लेक्टर बसविण्यात आले.यावेळी कोराणे म्हणाले, ग्रामीण भागातील रस्त्यांवर ऊस वाहतुकीच्या वाहनांची वर्दळ असते. ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर-ट्रॉलीज व बैलगाड्यांना सिग्नल नसल्याने रिप्लेक्टरची नितांत गरज असते. रात्रीच्या प्रवासात रिप्लेक्टर महत्त्वाचे काम करीत असल्याने अपघातापासून बचाव होण्यास मदत करतात. यापुढे रिप्लेक्टर न लावणार्या वाहनचालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. कार्यक्रमास सहायक मोटारवाहन निरीक्षक पल्लवी पांडव, बिद्री कारखान्याचे वाहनविभागप्रमुख महेश गंगापुरे, शेती अधिकारी महेश कावणे, सिव्हिल इंजिनिअर बी. बी. पाटील, सुरक्षा विभागप्रमुख बी. पी. पाटील, ज्ञानदेव फराकटे यांच्यासह कारखान्याचे कर्मचारी, वाहनचालक-मालक उपस्थित होते. (वार्ताहर)------फोटोबिद्री : वाहन सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी मोटारवाहन निरीक्षक ऋषिकेश कोराणे, पल्लवी पांडव, महेश गंगापुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.