३ जानेवारीला महिला शिक्षण दिन पाळा
By admin | Published: March 4, 2016 02:30 AM2016-03-04T02:30:30+5:302016-03-04T02:30:30+5:30
भारतातील पहिल्या शिक्षित महिला सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्मदिन देशभर महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर
नवी दिल्ली : भारतातील पहिल्या शिक्षित महिला सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्मदिन देशभर महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी गुरुवारी राज्यसभेत केली. सभागृहातील अनेक सदस्यांनी त्यांच्या या मागणीला पाठिंबा दिला.
सभागृहात विशेष उल्लेखाद्वारे ही मागणी करताना डॉ. मुणगेकर म्हणाले की, सावित्रीबाई यांनी पती महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक सुधारणेचे कार्य केले. महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिल्याचा उल्लेख करून ते म्हणाले की आजही महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी सावित्रीबार्इंचा जन्मदिन महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा व्हायला हवा.