पुणे शहरातील लष्करी आस्थापनांमध्ये होतेय कोरोनासंदर्भातल्या केंद्राच्या नियमावलीचे काटेकोर पालन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 01:35 PM2020-04-20T13:35:11+5:302020-04-20T13:46:24+5:30

पुण्यात देशातील तिन्ही दलांला लागणारे अधिकारी तयार करणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था

Followed central rules by the indian Army Establishment with social distansing in the pune city | पुणे शहरातील लष्करी आस्थापनांमध्ये होतेय कोरोनासंदर्भातल्या केंद्राच्या नियमावलीचे काटेकोर पालन

पुणे शहरातील लष्करी आस्थापनांमध्ये होतेय कोरोनासंदर्भातल्या केंद्राच्या नियमावलीचे काटेकोर पालन

Next
ठळक मुद्देप्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरण कक्ष, स्क्रिनिंगची सुविधा, शहरात महत्वाच्या संस्थाराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत असणाऱ्या विद्यार्थ्यांचीही विषेश काळजी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना 

निनाद देशमुख- 
पुणे : कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन शहरातील लष्करी आस्थापनांमध्ये केले जात आहे.  ताप तपासणी, निर्जंतुकीकरण कक्ष शहारातील आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे. याच बरोबर कार्यालयात मोजक्याच कर्मचारी अधिकारी काम करत असून सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळण्यात येत आहेत. गरजेनुसार जवानांची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ने आण केली जात आहे, अशी माहिती लष्कराचे प्रसिद्धी प्रमुख कर्नल अमन आनंद यांनी दिली.
पुण्यात लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे कार्यालय आहे. हवाई दलाचा देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हवाईतळ पुण्यात आहे. देशातील तिन्ही दलांला लागणारे अधिकारी तयार करणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था आहे. या बरोबरच पाच मिलिटरी स्टेशन, देहू, पुणे आणि खडकी या तिन लष्करी छावण्या, लष्करी अभियांत्रिकी महाविद्यायल, बॉम्बे सॅपर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशचे कार्यालय, लष्करी वैद्यकीय महाविद्यालय या सारख्या अनेक महत्वाच्या लष्कराच्या आस्थापना आहेत. या सोबतच संरक्षण संशोधन आणि विकास (डीआरडीओ)संस्थेच्या अनेक महत्वाच्या प्रयोगशाळा शहरात आहे.
या सर्व आस्थापनांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी केंद्राने केलेल्या सुचनांचे पालन केले जात आहेत. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात ५० टक्के मनुष्यबळात काम केले जात आहे. या ठिकाणी येणा-यांची ताप तपासणी केली जात आहे. निर्जंतुकीकरणासाठी कक्ष उभारण्यात आले आहे. कार्यालयात सोशल डिस्टंसिंग पाळले जात आहे. एखादा जवान आजारी असल्यास त्याची कमांड हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात येत आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत असणाऱ्या विद्यार्थ्यांचीही विषेश काळजी घेतली जात आहे. प्रबोधिनीच्या प्रवेशद्वारावर येणा-या जाणा-यांची तपासणी केली जात आहे. विद्यार्थ्यांनाही काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. प्रबोधिनित विद्यार्थ्यांची रोज तपासणी करण्यात येत आहे. मेसमध्ये तसेच क्लासरूमध्ये सोशल डिस्टसिंग पाळले जात आहेत. या सोबतच बाहेर होणारे विद्यार्थ्यांचे कार्यक्रम बंद करण्यात आले आहे. तर प्रबोधिनीत बाहेरून येणाऱ्यांनाही बंदी घालण्यात आली आहे.
एअरफोर्स स्टेशन या ठिकाणीही केंद्राच्या सुचनांचे पालन करण्यात येत आहे. अंतर्गत तसेच परदेशातील नागरी उड्डाणांसाठी हे तळ बंद करण्यात आले आहे. हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या तसेच इतर महत्वाच्या विमानांचे उड्डाण होत आहे.
..............
देशांत असलेल्या सर्व लष्करी आस्थापना, कार्यालये तसेच सीमेवर असलेल्या जवानांना कोरोनापासून दुर ठेवण्यासाठी केंद्राने दिलेल्या नियमावलीचे पालन केले जात आहे. या सोबतच लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनीही काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. आतापर्यंत लष्करात रूग्ण आढळलेले नाही. भविष्यातही त्या दृष्टीने काळजी घेण्यात येईल.
- कर्नल अमन आनंद, प्रसिद्धी प्रमुख, लष्कर

Web Title: Followed central rules by the indian Army Establishment with social distansing in the pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.