चंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देसम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 06:36 AM2018-03-08T06:36:25+5:302018-03-08T13:08:45+5:30

तेलगू देशमचे नेते आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमॆडळातून आपल्या मंत्र्यांना बाहेर पडण्याचे आदेश दिल्यानंतर ट्विटरवर एक वेगळं युद्ध भडकले आहे. तेदेपा समर्थक आणि भाजपा समर्थक यांच्यातील हे युद्ध चर्चेचा विषय ठरले आहे.

Following the decision of Chandrababu Naidu, Twitter War between Telugu Desam and BJP supporters | चंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देसम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर

चंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देसम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर

googlenewsNext

नवी दिल्ली -  तेलगू देशमचे नेते आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमॆडळातून आपल्या मंत्र्यांना बाहेर पडण्याचे आदेश दिल्यानंतर ट्विटरवर एक वेगळं युद्ध भडकले आहे. तेदेपा समर्थक आणि भाजपा समर्थक यांच्यातील हे युद्ध चर्चेचा विषय ठरले आहे.

"मी पंतप्रधानांना आमच्या निर्णयाची माहिती पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने ते उपलब्ध नव्हते!" चंद्राबाबू यांना बुधवारी रात्री 11वाजून 34 मिनिटांनी हे ट्विट केले. त्यानंतर पाच मिनिटांनी त्यांनी दुसरं ट्विट करुन "निर्णायक वेळ. आपण उभं ठाकलंच पाहिजे. आपण लढलंच पाहिजे. आपण करुन दाखवलंच पाहिजे." असं दुसरं ट्विट केलं आहे. त्यांच्या ट्विट्सवर समर्थन देणाऱ्या प्रतिक्रिया जशा व्यक्त होत आहेत तशाच नकारात्मकही. 

















 

काही भाजपा समर्थक ट्विटर हँडलवरुन चंद्राबाबूंची आंध्रसाठी भाजप सरकारने किंवा पंतप्रधानांनी काहीच केले नाही, ही तक्रार चुकीची ठरवत नेमकं काय केलं गेलं त्याची माहिती देण्यात आली आहे. तसंच काहींनी "आता तुम्हाला कळलं असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्लॅकमेलिंगला भाव देत नाहीत" असंही सुनावण्यात आलं आहे.  मात्र तेदेपा समर्थक हँडलवरुन भाजपा समर्थकांची माहिती चुकीची ठरवणारी आकडेवारी सादर करण्यात आली आहे.

 

Web Title: Following the decision of Chandrababu Naidu, Twitter War between Telugu Desam and BJP supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.