फक्त 100 रुपयांत वाचवा हजारो रुपयांचं चलन, 15 दिवसांचा मिळतो अवधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 05:06 PM2019-09-12T17:06:28+5:302019-09-12T17:11:33+5:30

जर आपल्याला ई-चलन पाठवलं असल्यात आता घाबरण्याची गरज नाही.

following things due to which you do not have to pay traffic penalties | फक्त 100 रुपयांत वाचवा हजारो रुपयांचं चलन, 15 दिवसांचा मिळतो अवधी

फक्त 100 रुपयांत वाचवा हजारो रुपयांचं चलन, 15 दिवसांचा मिळतो अवधी

Next

नवी दिल्लीः जर आपल्याला ई-चलन पाठवलं असल्यास आता घाबरण्याची गरज नाही. खरं तर नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास 10 टक्के जास्त दंड आकारला जात आहे. त्यामुळे मोठ्या रकमेचं चलन आपल्याकडून वसूल केलं जातं. परंतु एवढं मोठं चलन पाठवल्यानंतर वाहन चालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त 100 रुपयांमध्ये एवढ्या जास्त रकमेचं चलन आपण वाचवू शकतो. परंतु त्यासाठी ई-चलन पाठवल्यानंतर ते तात्काळ भरू नये. 

चलन पाठवल्यास घाबरू नका
खरं तर अनेक राज्यात नवे वाहतुकीचे नियम लागू झाल्यापासून ट्रॅफिक पोलिसांकडून आतापर्यंत दंडाच्या स्वरूपात लोकांकडून 1.41 लाख रुपयांचा चलन फाडण्यात आलं आहे. अशातच तुमच्याकडून चलन वसूल करण्याचं ठरवल्यास अजिबात घाबरू नका. पहिल्यांदा आपण वाहतुकीचा कोणता नियम मोडल्याचा आरोप लावण्यात आला आहे ते माहिती करून घ्या, त्यानंतर पुढची कारवाई करा.

कोर्टात चलन भरण्याचा आहे पर्याय
विशेष म्हणजे आपण न्यायालयात जाऊनही चलन भरू शकता. म्हणजेच ट्रॅफिक पोलिसांकडेच चलन भरण्याची आवश्यकता नाही. फक्त 100 रुपयांमध्ये भारी भक्कम चलन भरण्यापासून आपला बचाव होऊ शकतो. 

100 रुपयांत कसा वाचणार चलन
जर वाहन चालवत असताना गाडीचं एखादं कागदपत्र नसल्यास मोठ्या रकमेचं चलन फाडलं जातं. खरं तर गडबडीत बऱ्याचदा आपण गाडीची कागदपत्र घरीच विसरतो. ज्यात ड्रायव्हिंग लायसन्सबरोबर गाडीचं नोंदणी पत्र आणि पीयूसी असते. अशाच वेळी जर आपल्याला ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यास मोठं चलन फाडलं जाऊ शकते. पोलिसांनी चलन फाडलं असलं तरी घाबरून जाण्याची गरज नाही. चलनची रक्कम तात्काळ भरू नका. खरं तर अशा वेळी आपल्याकडे 15 दिवसांचा अवधी असतो. जिथे आपण कोर्टात जाऊन गाडीचे कागदपत्र दाखवू शकता. त्यामुळे हजारो रुपयांचं फाडलेल्या चलनऐवजी 100 रुपये भरून आपण दंडापासून वाचू शकता. यात इन्शुरन्स पेपर्स, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि पीयूसीचा समावेश आहे. 

चुकी असल्यास माफ होणार नाही चलन
चलन फाडण्यापूर्वीच गाडीचे पेपर तयार असल्यास चलन माफ होऊ शकते. जर आपल्याकडे इन्शुरन्स पेपर्स नसल्यास 15 दिवसात आपण कोर्टात चलन भरू शकता. परंतु तर इन्शुरन्स रिन्यू केलेलं नसल्यास आपल्याला चलनच्या स्वरूपात केलेला दंड भरावा लागणार आहे. 

Web Title: following things due to which you do not have to pay traffic penalties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.