हॉकर्स दाव्याप्रकरणी उपायुक्तांकडून मागविले प्रमाणपत्र स्थलांतर प्रकरण : ४ रोजी होणार पुढील कामकाज
By admin | Published: June 24, 2016 09:10 PM2016-06-24T21:10:35+5:302016-06-24T21:10:35+5:30
जळगाव: स्थलांतराच्या विरोधात बळीरामपेठेतील हॉकर्सने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी शुक्रवारी न्या.पी.आर. बोरा यांच्या समोर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने स्थलांतरासाठी पुरेशी जागा असल्याबाबत तसेच एकच ओटा दोन लोकांना दिलेला नसल्याबाबत उपायुक्तांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी आता ४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
Next
ज गाव: स्थलांतराच्या विरोधात बळीरामपेठेतील हॉकर्सने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी शुक्रवारी न्या.पी.आर. बोरा यांच्या समोर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने स्थलांतरासाठी पुरेशी जागा असल्याबाबत तसेच एकच ओटा दोन लोकांना दिलेला नसल्याबाबत उपायुक्तांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी आता ४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. मनपाने सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत बळीरामपेठेतील हॉकर्सचे गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतर करण्यात येणार आहे. मात्र आधीच त्या ओट्यांवर हॉकर्स असल्याने तेथे जागाच नसल्याचा दावा करीत बळीरामपेठेतील हॉकर्सने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दावा दाखल केला आहे. त्यात शुक्रवारी कामकाज झाले. त्यात मनपातर्फे गोलाणी ४१५ ओटे असून त्यांची मुदत २००८ मध्येच संपली आहे. तरीही आयुक्तांनी सहानुभूती म्हणून नियमितपणे व्यवसाय करणार्या नोटरीधारक १३० हॉकर्सला त्याच ओट्यांवर व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. तर उर्वरित २५० ओट्यांवर बळीरामपेठेतील हॉकर्सला जागा देण्यासाठी सोडत काढण्यात आली असल्याचे मनपाचे वकील पी.आर. पाटील यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने उपायुक्तांनी याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेश दिले. हॉकर्सच्यावतीने ॲड.विजय पाटील काम बघत आहेत.