रोबोटकडून रुग्णांना जेवण अन् औषध!, बंगळुरूच्या रुग्णालयाचा अभिनव उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:54 AM2020-04-27T03:54:33+5:302020-04-27T03:54:43+5:30
तिथे रुग्णांना जेवण तसेच औषध देण्याचे काम एका रोबोटमार्फत करून घेण्यात येते.
बंगळुरू : कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका काही प्रमाणात कमी करण्यासाठी येथील व्हिक्टोरिया रुग्णालयाने एक शक्कल लढविली आहे. तिथे रुग्णांना जेवण तसेच औषध देण्याचे काम एका रोबोटमार्फत करून घेण्यात येते.
डॉक्टर तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून व्हिक्टोरिया रुग्णालयाचे प्रशासन अत्यंत सजग आहे. त्यामुळेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत तिथे रोबोटच्या मदतीने ‘कोविड-१९’च्या रुग्णांना जेवण व औषधे देण्यात येतात. कर्नाटकामध्ये या साथीमुळे १८ हून अधिक रुग्णांचा बळी गेला असून, १५८ पेक्षा जास्त रुग्ण उपचारांनंतर पूर्णपणे बरे झाले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणाºया डॉक्टरांना लोकांकडून मारहाण होण्याचे काही प्रकार देशात घडले आहेत. त्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली. डॉक्टरांवर हल्ला करणाºयास ७ वर्षांची कैद व पाच लाख रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद असलेला वटहुकूम केंद्र सरकारने नुकताच जारी केला. साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ साली करण्यात आला होता.
या कायद्यातील तरतुदींत बदल करणारा हा वटहुकुम आहे. कोरोना साथीच्या काळात डॉक्टरांविरोधात घडलेले सर्व प्रकार लक्षात घेऊन आता रुग्णालये देखील दक्षता बाळगत आहेत.
>कर्नाटकमध्ये वाढता फैलाव
क र्नाटकमध्ये कोरोना विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेता लॉकडाऊनचे निर्बंध अधिक काटेकोरपणे अमलात आणण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. बंगळुरू शहर व बंगळुरू ग्रामीण अशा दोन्ही भागामध्ये नवे रुग्ण शनिवारी सापडले होते. कर्नाटकातील दक्षिण कन्नडा जिल्ह्यातल्या मंड्या, चिक्कबल्लपुरा, बंटावाला परिसरातही या साथीचा झपाट्याने प्रसार झाला आहे.