जेवणातून विषबाधा; आठ जणांचा मृत्यू
By admin | Published: May 31, 2017 01:00 AM2017-05-31T01:00:11+5:302017-05-31T01:00:11+5:30
चर्चमधील समारंभानंतर जेवणात डुकराचे मांस खाल्ल्याने विषबाधा होऊन आठ जणांचा मृत्यू झाल्याची आणि किमान १00 जणांना
Next
शिलाँग : चर्चमधील समारंभानंतर जेवणात डुकराचे मांस खाल्ल्याने विषबाधा होऊन आठ जणांचा मृत्यू झाल्याची आणि किमान १00 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याची घटना मेघालयात घडली.
येथील रि भोई जिल्ह्यातील नाँगक्या गावातील चर्चमध्ये वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर तिथेच सर्वांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. जेवणात भात व डुकराच्या मांसाचा समावेश होता. जेवल्यानंतर अनेकांना त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी आठ जण मरण पावले आणि सुमारे १00 जणांवर उपचार सुरू आहेत. अन्न तपासणी अधिकाऱ्यांनी जेवणाचे नमुने ताब्यात घेतले आहेत.