ॲम्वेकडून सिंहस्थातील बारा हजार पोलिसांना फूडबॅग
By admin | Published: August 26, 2015 12:19 AM2015-08-26T00:19:03+5:302015-08-26T00:19:03+5:30
नाशिक : देशाच्या सीमेवर जवान तर अंतर्गत कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही पोलीस यंत्रणा पार पाडत असते़ जनसामान्यांच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणार्या पोलिसांप्रती सामाजिक बांधिलकी जपत विविध कंपन्यांनी योगदान दिले आहेत़ कंपन्यांची ही सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका प्रत्येक पोलीस कर्मचार्यास कर्तव्याची आठवण करून देईल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांनी केले़ पोलीस मुख्यालयात मंगळवारी (दि़२५) ॲम्वे इंडिया एंटरप्रायजेस या कंपनीच्या वतीने बारा हजार पोलिसांना देण्यात येणार्या फूडबॅगच्या प्रातिनिधीक वितरणप्रसंगी ते बोलत होते.
Next
न शिक : देशाच्या सीमेवर जवान तर अंतर्गत कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही पोलीस यंत्रणा पार पाडत असते़ जनसामान्यांच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणार्या पोलिसांप्रती सामाजिक बांधिलकी जपत विविध कंपन्यांनी योगदान दिले आहेत़ कंपन्यांची ही सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका प्रत्येक पोलीस कर्मचार्यास कर्तव्याची आठवण करून देईल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांनी केले़ पोलीस मुख्यालयात मंगळवारी (दि़२५) ॲम्वे इंडिया एंटरप्रायजेस या कंपनीच्या वतीने बारा हजार पोलिसांना देण्यात येणार्या फूडबॅगच्या प्रातिनिधीक वितरणप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सिंहस्थासाठी आलेले साधू, महंत तसेच कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे पंधरा हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. शाही पर्वणीच्या कालावधीत अन्न पाण्याची पर्वा न करता त्यांना सुमारे ४८ तास एकाच ठिकाणी उभे राहून कर्तव्य बजवावे लागणार आहेत़ या कालावधीत त्यांना अन्न व पाणी पुरविण्याचा प्रशासनापुढील पेच ॲम्वे कंपनीने सामाजिक बांधिलकीतून सोडविला आहे़ यावेळी कंपनीचे व्यवस्थापक आशिष वैद्य यांनी पोलीस तसेच शासकीय प्रशासनाने सामाजिक सेवेची संधी दिल्यास कंपनी तत्काळ तयार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी पोलीस उपायुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त सचिन गोरे, ॲम्वे इंडिया कंपनीचे राज्य मुख्याधिकारी भवानी आयथा, विभाग प्रमुख संदीप प्रकाश, प्रशांत पवार, प्रसिद्धी व्यवस्थापक जिग्नेश शहा तसेच ॲम्वेचे नाशिकमधील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन जी. एस. चौधरी यांनी केले़ सहायक आयुक्त राजू भुजबळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)--इन्फो--ॲम्वे कंपनीने दिलेल्या या प्रत्येक बॅगेमध्ये एक पाण्याची बाटली, शंभर ग्रॅम चिक्की, डायफ्रुटचे दोन लाडून, बिस्कीटचे दोन पुडे असणार आहे़ विशेष म्हणजे अशा प्रकारच्या बारा हजार बॅगांचे वाटप केले जाणार असून, पोलिसांना ही बॅग पाठीवर अडकविता येणार आहे़फोटो :- आर / फोटो / २५पोलीस ॲम्वे फोटो या नावाने सेव्ह केला आहे़सिंहस्थातील बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचार्यांना ॲम्वे कंपनीने दिलेल्या फूडबॅगचे प्रातिनिधी स्वरूपात वितरण करताना ॲम्वेचे व्यवस्थापक आशिष वैद्य व पोलीस आयुक्त एस़जगन्नाथऩ समवेत अधिकारी वर्ग़