खाद्यसंस्कृती - पनीर टोस्ट सँडविच

By Admin | Published: March 14, 2015 11:45 PM2015-03-14T23:45:34+5:302015-03-14T23:45:34+5:30

साहित्य : ब्रेडचे ६ स्लाईसेस, ३ टे. स्पून कांदा, उभा पातळ चिरून, ३ टे. स्पून भोपळी मिरची, उभे पातळ कप, १ टी स्पून चाट मसाला, ३ टे. स्पून हिरवी चटणी, १ टे. स्पून बटर.

Foodsculture - Cheese Toast Sandwich | खाद्यसंस्कृती - पनीर टोस्ट सँडविच

खाद्यसंस्कृती - पनीर टोस्ट सँडविच

googlenewsNext
हित्य : ब्रेडचे ६ स्लाईसेस, ३ टे. स्पून कांदा, उभा पातळ चिरून, ३ टे. स्पून भोपळी मिरची, उभे पातळ कप, १ टी स्पून चाट मसाला, ३ टे. स्पून हिरवी चटणी, १ टे. स्पून बटर.
स्टफिंग : ७५ ग्रॅम पनीर, लहान चौकोनी तुकडे, १/२ टी स्पून जिरेपूड, २ ते ३ टे. स्पून टोमॅटो केचप, चवीपुरते मीठ.

कृती : १) एका लहान बाऊलमध्ये टोमॅटो केचप, जिरेपूड आणि अगदी चिमूटभर मीठ घालून मिक्स करावे. यामध्ये पनीरचे तुकडे १० मिनिटे मॅरिनेट करून ठेवावे.
२) पनीरचे तुकडे ग्रिल करावेत. जर ग्रिल नसेल तर नॉनस्टिक पॅनमध्ये थोड्या बटरवर किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडे परतून घ्यावे. ग्रिल केल्यावर पनीर बाजूला काढून ठेवावे.
३) ब्रेड स्लाईसेसवर बटर लावून घ्यावे. कमी आचेवर ब्रेड थोडे टोस्ट करून घ्यावे.
४) ३ ब्रेड स्लाईसेसवर हिरवी चटणी लावून घ्यावी. त्यावर पनीरचे तुकडे आणि भाज्या घालाव्यात. थोडा चाट मसाला भुरभुरावा. आता उरलेले ब्रेड स्लाईसेस घेऊन त्यावर हिरवी चटणी लावावी आणि पनीरच्या तुकड्यांवर ठेवून सँडविच तयार करावे.
५) सँडविचेस ग्रिल करून घ्यावेत किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये थोडे बटर घालून दोन्ही बाजू मध्यम आचेवर टोस्ट कराव्यात. जर नॉनस्टिक पॅन वापरणार असाल तर आच कमी ठेवावी आणि २-३ मिनिटांनी कालथ्याने हलकेच पलटावे. दुसरी बाजूही छान भाजून घ्यावी.

सँडविच हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावे.

Web Title: Foodsculture - Cheese Toast Sandwich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.