युपीए-एनडीएच्या सामन्यात माझा झाला फुटबॉल - विजय मल्ल्या
By admin | Published: February 3, 2017 12:07 PM2017-02-03T12:07:05+5:302017-02-03T15:14:54+5:30
बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्यांनी 'निर्दोषत्वचा' सूर आळवला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्यांनी 'निर्दोषत्वचा' सूर आळवत सीबीआय आणि सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. 'युपीए -एनडीएच्या सामन्यात मधल्यामध्ये माझा फुटबॉल झाल्याचे सांगत दाद मागायला अंपायरही नाही' असे ट्विट मल्ल्यांनी केले आहे. तसेच त्यांनी सीबीआयच्या तपासावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
फरारी कर्जबुडव्यांना देशातील न्यायव्यवस्थेसमोर उभं करण्यासाठी कठोर कायदा लागू करण्याचा उल्लेख अर्थमंत्री अरूण जेटलींनी अर्थसंकल्पादरम्यान केला होता. तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्या दबावामुळेच मल्ल्यांना ९ हजार कोटींचे कर्ज दिल्याचा आरोपही भाजपाने केला होता. मात्र काँग्रेसने तो आरोप फेटाळून लावला. याच सर्व पार्श्वभूमीवर विजय मल्ल्यांनी ' मी नाही त्यातला' असा आव आणत ट्विटवरुन टीकास्त्र सोडले.
' आता प्रसारमाध्यमांचा वापर खेळपट्टी म्हणून केला जात असून, माझा फुटबॉल बनला आहे. या सामन्यात एनडीए आणि यूपीए हे दोन संघ खेळत असून दुर्दैवाने दाद मागायला सामन्यात पंचच नाही' असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच ' सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांमुळे मला धक्काच बसला असून ते सर्व आरोप निराधार आहेत' असेही त्यांनी म्हटले आहे.
Media happily being used as the pitch. I am the football. Two fiercely competitive teams NDA versus UPA playing.Unfortunately no Referees.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) February 3, 2017
Am shocked at CBI allegations.All false and misconceived to say the least What do a bunch of elite Police know about business and Economics?
— Vijay Mallya (@TheVijayMallya) February 3, 2017
CBI made such a great drama accusing the Maran's and putting them to great harm. What finally happened. Did truth prevail or CBI prevail ?
— Vijay Mallya (@TheVijayMallya) February 3, 2017