माझ्यासाठी पक्षापेक्षा 'धर्म सुरक्षा' महत्त्वाची, हकालपट्टीनंतर टी राजानं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 06:31 PM2022-08-24T18:31:52+5:302022-08-24T18:41:06+5:30

नुपूर शर्मा यांच्यानंतर टि. राजासिंह यांच्या वक्तव्याने भाजप पक्ष अडचणीत आला होता.

For me, 'Dharma Suraksha' is more important than the party, T Raja clearly said after the expulsion by bjp party | माझ्यासाठी पक्षापेक्षा 'धर्म सुरक्षा' महत्त्वाची, हकालपट्टीनंतर टी राजानं स्पष्टच सांगितलं

माझ्यासाठी पक्षापेक्षा 'धर्म सुरक्षा' महत्त्वाची, हकालपट्टीनंतर टी राजानं स्पष्टच सांगितलं

Next

कट्टर हिंदुत्त्ववादी विचारांचे प्रचारक असलेल्या भाजपच्या आमदाराने मोहम्मद पैगंबरांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. याप्रकरणात न्यायालयाने आमदार टी. राजा सिंह यांना इशारा देत जामीन दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने त्यांना सर्वप्रथम 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला होता. मात्र नंतर, न्यायालयाने रिमांडचा आदेश मागे घेत त्यांना जामीन दिला. पोलिसांनी टी. राजा सिंह यांना हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयात हजर केले होते. तुरुंगातून बाहेर येताच पुन्हा एकदा राजासिंह यांनी धर्मापेक्षा आपल्यासाठी दुसरं काहीही मह्त्त्वाचं नसल्याचं म्हटलं आहे. 

नुपूर शर्मा यांच्यानंतर टि. राजासिंह यांच्या वक्तव्याने भाजप पक्ष अडचणीत आला होता. त्यामुळे, भाजपने टी. राजा यांचीही पक्षातून हकालपट्टी करत त्यांना भाजपमधून निलंबित केले आहे. एवढेच नाही, तर पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत 10 दिवसांत उत्तर द्यायलाही सांगितले आहे. पैगंबर मोहम्मदांवरील वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी त्यांना मंगळवारी सकाळी अटक केली होती. मात्र, आज त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तुरुंगातून सुटका होताच त्यांनी पुन्हा एकदा आपलं हिंदुत्त्वादी विचारप्रेम दाखवून दिलं आहे. 

भाजपातून हकालपट्टी केल्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता, माझ्यासाठी धर्म सुरक्षेपेक्षा पक्ष मोठा नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच, मी आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा निष्ठावान सैनिक आहे. त्यांबद्दल आजही माझ्या मनात तेवढाच आदर आहे, मी काहीही चुकीचं विधान केलं नाही, असेही राजासिंह यांनी म्हटले. 

राजासिंह विरुद्ध काय आहे गुन्हा

टी. राजा सिंह यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 153ए (विविध समूहांमध्ये शत्रुत वाढविणे), 295 (धर्माचा अपमान करण्याच्या हेतूने पूजा स्थळाचा अपमान करणे अथवा ती अपवित्र करणे.) आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्यात आली होती. 

यापूर्वीही अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य -

टी राजा सिंह यांनी यापूर्वीही अनेकदा वेळा आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या वर्षी जूनमध्ये हैदराबाद पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. टी राजा सिंह यांच्याविरोधात हैदराबादचे रहिवासी मोहम्मद अली यांनी तक्रार दाखल केली होती. त्याने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, टी राजा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये राजा सिंह अल्पसंख्याक समुदायाबद्दल अपमानास्पद बोलतांना दिसत होते. याप्रकरणी कांचनबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: For me, 'Dharma Suraksha' is more important than the party, T Raja clearly said after the expulsion by bjp party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.