प्रजासत्ताक दिनी यंदा प्रथमच 'गरुड स्पेशल फोर्स' दिसणार, थरारक कसरती होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 21:29 IST2023-01-22T21:26:46+5:302023-01-22T21:29:01+5:30
प्रजासत्ताक दिनी यंदा वायूसेनेचं गुप्तहेर विमान आयएल-३८ हेही सहभागी होत आहे

प्रजासत्ताक दिनी यंदा प्रथमच 'गरुड स्पेशल फोर्स' दिसणार, थरारक कसरती होणार
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा दैदिप्यमान होत आहे. त्यासाठी, सैन्य दलापासून ते सर्वच राज्याचे चित्ररथही प्रदर्शन आणि थरारक कसरतींसाठी सज्ज झाले आहेत. यंदाच्या प्रजासत्ताकदिनाचे वैशिष्ट म्हणजे यंदा प्रथम भारतीय वायू सेनेच्या गरुड पथकाचे संचलन राजपथवर पाहायला मिळणार आहे. स्क्वाड्रन लीडर पी.एस. जैतावत हे गरुड दलाचे नेतृत्त्व करणार आहेत. तर, स्क्वाड्रन लीडर सिंधु रेड्डी या दलाच्या कमांडर असणार आहेत.
प्रजासत्ताक दिनी यंदा वायूसेनेचं गुप्तहेर विमान आयएल-३८ हेही सहभागी होत आहे. या शुभ दिनी पहिल्यांदाच आणि शेवटचं राजपथासमोर उड्डाण भरण्याची संधी देण्यात आली आहे. यावेळी, भारत निर्मित शक्ती या मिसाईलचेही प्रदर्शन होणार असून विशेष शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
भारतीय वायूसेनेच्या आयएल-३८एस डी. विमानाने ४४ वर्षे देशासाठी सेवा दिली. १७ जनवरी, २०२२ रोजी या विमानास वायूसेनेतून हटविण्यात आले. यापूर्वी १९७७ मध्ये वायूसेनेत हे विमान सहभागी करुन घेतले होते. आपल्या संपूर्ण सेवा कार्यकाळात हे विमान मोठ्या ताकदीने सैन्य दलासोबत होते. आयएल-३८ खूपवेळ चालणारा आणि सर्वच ऋुतूंना अनुकूल पर्याप्त ऑपरेटिंग रेंज वाले विमान ठरले आहे.
दरम्यान, भारतीय वायूसेनेचे ४५ विमान यंदाच्या परेडमध्ये सहभागी होत आहेत. तसेच, वायूदलाचे १ आणि लष्कराचे ४ हेलिकॉप्टरही फ्लाय-पास्टमध्ये दिसणार आहेत. त्यासह, मिग-२९, राफेल, जॅग्वार, एसयू-३० आदि विमानोंद्वारे एरो, एब्रस्ट, एरोहेड, डायमंड आणि इतर एकूण १३ फॉर्मेशन असणार आहेत.