हव्या त्या ठिकाणी बदली होण्यासाठी मोर्चेबांधणी
By admin | Published: April 4, 2015 01:55 AM2015-04-04T01:55:06+5:302015-04-04T01:55:06+5:30
जिल्हा परिषद : एप्रिल व मे महिन्यात कर्मचाऱ्यांच्या बदल्या
Next
ज ल्हा परिषद : एप्रिल व मे महिन्यात कर्मचाऱ्यांच्या बदल्यानागपूर : जिल्हा परिषदेतील गट क आणि ड या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या एप्रिल व मे महिन्यात केल्या जातात. ३१ मे पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याने हव्या त्या ठिकाणी बदली होण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोर्चेबांधणी चालविली आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बदल्यासंदर्भातील अधिकार प्रदान करण्यात आले आहे. त्यात अपिलीय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांना अधिकार प्रदान करण्यात आले आहे. बदल्यांची प्रक्रिया राबविताना अनियमितता झाल्याच्या तकारी होतात. असे प्रकार थाबंविण्यासाठी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे अभिप्राय मागविण्यात आले आहे.बदल्यासंदर्भात होणाऱ्या तक्रारी विचारात घेता गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने समायोजन केले जाते. निकषाच्या आधारे बदलीप्राप्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. यात संबंधित कर्मचाऱ्यांनाही विचारणा केली जाते. प्रक्रि या पारदर्शी असली तरी सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना यातील पळवाटांचीही माहिती आहे. त्यामुळे शहरालगतच्या हिंगणा, कामठी, उमरेड व नागपूर तालुक्यात बदली व्हावी, यासाठी शिक्षक व कर्मचारी मोर्चेबांधणीला लागले आहे. बदल्यात मोठ्या पदाधिकारी हस्तक्षेत करतात.त्यांच्या मर्जीतील कर्मचारी वा शिक्षकाची सुविधा होत असली तरी यामुळे इतरांवर अन्याय होतो.(प्रतिनिधी)चौकटबदलीनंतरही विभागात ठाण मांडूनजिल्ह्यांतर्गत बदल्यात मुख्यालयातून तालुक्याच्या ठिकाणी बदली झालेले अनेक कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून मुख्यालयात ठाण मांडून आहेत. एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली झाल्यानंतरही विभागप्रमुख मर्जीतील कर्मचाऱ्यांना सोडत नाही. अशा कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. यात पात्र कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे चित्र आहे.चौकट...दुर्गम भागात जाण्याला नकारजिल्ह्याच्या दुर्गम व अदिवासीबहुल तसच नागपूर शहरापासून लांब अंतरावरील ठिकाणी बदली नको म्हणून शिक्षकांचा प्रयत्न असतो. काही शिक्षक वर्षानुवर्षे नागपूर लगतच्या तालुक्यात आहेत. दुसरीकडे सेवानिवृत्तीला आलेल्या काही शिक्षकांना मागणी करूनही हव्या त्या ठिकाणी बदली मिळत नसल्याचे चित्र आहे.