परदेशी उडालेले पक्षी कोणत्या देशातले?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 10:08 AM2023-09-15T10:08:24+5:302023-09-15T10:09:25+5:30
नोकरी-व्यवसायाच्या शोधात परदेशी स्थलांतर करणाऱ्या नागरिकांची संख्या कोणत्या देशात सर्वाधिक असेल?- या प्रश्नाचे ताजे उत्तर आहे - अर्थातच - भारत!
नोकरी-व्यवसायाच्या शोधात परदेशी स्थलांतर करणाऱ्या नागरिकांची संख्या कोणत्या देशात सर्वाधिक असेल?- या प्रश्नाचे ताजे उत्तर आहे - अर्थातच - भारत! आपल्या देशातल्या उच्च दर्जाच्या गुणवत्तेला जगाने दारे उघडलेली असल्याने जगात सर्वाधिक डायास्पोरा - म्हणजे विदेशी वास्तव्य करणारे भारतीय वंशाचे नागरिक- हा मान आपल्या देशाकडे जातो. २०२० साली सुमारे १ कोटी ७९ लाख (भारतात जन्मलेले) नागरिक विविध देशांत राहात असल्याची संयुक्त राष्ट्रसंघाची ताजी आकडेवारी आहे. त्यानंतर नंबर लागतो तो मेक्सिको आणि रशियाचा ! २००० ते २०२० या गेल्या वीस वर्षांत भारताने या दोन्ही देशांना मागे टाकले आहे. युद्धग्रस्त सीरियन लोकांची रानोमाळ अवस्थाही सोबतच्या आलेखात स्पष्ट दिसते.