राम मंदिरासाठी विदेशी देणग्या स्वीकारता येणार; केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 07:12 AM2023-10-19T07:12:26+5:302023-10-19T07:12:35+5:30
देणग्या विनियम कायद्याद्वारे परदेशातून राम मंदिरासाठी देणग्या स्वीकारण्यास ट्रस्टला गृहखात्याने परवानगी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या राममंदिरासाठी विदेशातून देणग्या स्वीकारण्यास श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र या ट्रस्टला केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी दिली आहे. ही माहिती या ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे एसबीआयच्या मुख्य शाखेमध्ये बँक खाते असून, तिथे देणग्या पाठविता येतील. देणग्या विनियम कायद्याद्वारे परदेशातून राम मंदिरासाठी देणग्या स्वीकारण्यास ट्रस्टला गृहखात्याने परवानगी दिली.
२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा साेहळा?
राममंदिर तीन मजली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होण्याची तसेच या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राममंदिराच्या वास्तूची उंची १६१ फूट असून, प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट असेल. मंदिराच्या बांधकामात ३५०० कामगारांचा सहभाग आहे.