सेवा क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढली
By Admin | Published: March 6, 2017 04:16 AM2017-03-06T04:16:45+5:302017-03-06T04:16:45+5:30
देशाच्या सेवा क्षेत्रात चालू आर्थिक वर्षात पहिल्या नऊ महिन्यांत प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) ७७.६ टक्के वाढली आहे
नवी दिल्ली : देशाच्या सेवा क्षेत्रात चालू आर्थिक वर्षात पहिल्या नऊ महिन्यांत प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) ७७.६ टक्के वाढली आहे. ही गुंतवणूक ७.५५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
सरकारने वृद्धीसाठी जी पावले उचलली आहेत, त्यामुळे यात वाढ झाली आहे. सेवा क्षेत्रात बँकिंग, विमा, आऊटसोर्सिंग, कुरिअर, तंत्रज्ञान सेवा यांचा समावेश होतो. २०१५-१६ च्या एप्रिल- डिसेंबरमध्ये सेवा क्षेत्रात ४.२५ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आली होती. देशातील जीडीपीत सेवा क्षेत्राचे योगदान ६० टक्के आहे. देशात येणाऱ्या एकूण विदेशी गुंतवणुकीत हे योगदान १७ टक्के आहे.